मुंबई : 'बिग बॉस' फेम अभिनेता एजाज खानना सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एजाज खानने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण होईल, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यासंबधी खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी पोलिसांनी माहिती दिली की, सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, यासाठी सरकारकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत. मात्र एजाज खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी वक्तव्य केली होती. याप्रकरणी त्याच्याविरोधात आयपीसी कलम 153 अ, 121, 117, 188, 501, 504, 505(2)  कलमांर्तगत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


एजाज खानला पोलिसांनी अटक केल्याची ही पहिली घटना नाही. याआधीही एजाज खान अनेकदा वादात सापडला आहे. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली होती. वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी एजाज खानला गेल्यावर्षी जुलै महिन्यात अटक झाली होती. त्याआधी ऑक्टोबर 2018 मध्ये बंदी असलेले औषधे जवळ बाळगल्याप्रकरणी एजाजला अटक झाली होती. याशिवाय तरजेब अन्सारी मृत्यू प्रकरणानंतर भडकाऊ व्हिडीओ तयार केल्याप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी एजाजने टिकटॉकचा 07 ग्रुपचं समर्थन केलं होतं. या ग्रुपमधील पाच मुलांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.


संबंधित बातम्या 

Special Report | निजामुद्दीनमधून देशभरात कसा पसरला कोरोना? 24जण पॉझिटिव्ह, 334रुग्णालयात, 700क्वॉरंटाईन