नवी दिल्ली : जगभरात हैदोस घालणारा कोरोना आता भारतातही दाखल झाला आहे. भारतात 30 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचं समोर आलं आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक पॉझिटिव्ह रूगण आढळला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा रूग्ण मध्यमवयीन असून नुकताच इराणला गेला होता. या 30 रूग्णांपैकी 16 रूग्ण हे इटलीचे पर्यटक आहे.


दिल्लीतील सर्व प्रायमरी स्कूल 31 मार्चपर्यंत बंद

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिल्लीतील सर्व प्रायमरी स्कूल (सरकारी आणि खासगी) 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. तसेच दिल्ली सररकारने कार्यालयातील बायोमेट्रिक अटेंडन्स देखील काही काळासाठी बंद केली आहे. कोरोना व्हायरसचे वाढते प्रमाण पाहता दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्यांना आदेश

मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार 4 मार्च पर्यंत सर्व विदेशी नागरिकांची तपासणी करणे अनिवार्य आहे. मंगळवारपासून (4 मार्च) देशातील सर्व विमानतळांवर तपासणी सुरू करण्यात आली आहे.

सांगलीत बायोमेट्रिक हजेरी बंद

कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सांगलीच्या महावितरणच्या कार्यालयामध्ये बायोमेट्रिक हजेरी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. कोरोना संपर्कातून आणि स्पर्शातून पसरणारा वायरस असल्याने ही खबरदारी घेतली जात आहे.

Coronavirus | N95 मास्कचा काळाबाजार, 150 रुपयांच्या मास्कची तब्बल 300 रुपयांना विक्री



बिदरमध्ये कोरोनाचे तीन संशयित

महाराष्ट्राच्या सीमेवर कोरोनाचे तीन संशयित रुग्ण सापडले आहेत. कर्नाटकातल्या बिदरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बिदर जिल्ह्यातील औराद बाराळी येथे दोन जण नुकतेच कतारमधून आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांना सर्दी, ताप अशी लक्षणं दिसत होती. तसंच नॉर्वेमधून भारतात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीलाही अशीच समस्या जाणवत होती. त्यामुळं संबंधित रुग्णांना बिदरमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. डॉक्टरांचं पथक त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे.

कॅलिफोर्नियामध्ये आणीबाणी

कोरोना विषाणूच्या धास्तीनं कॅलिफोर्निया शहरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गेविन न्यूसोम यांनी आणीबाणी घोषित केली आहे. तरी, कोरोनामुळे कॅलिफोर्नियातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर 53 जण कोरोनाबाधित आहेत.

संबंधित बातम्या : 

Corona Virus | भारतातील 'या' शहरांमध्ये कोरोनाची बाधा; देशभरात 29 जणांना लागण

Coronavirus | कोरोनाग्रस्त महिलेमुळे पाळीव कुत्र्यालाही लागण; माणसामुळे प्राण्याला लागण झाल्याचं पहिलं उदाहरण

Coronavirus | कोरोनापासून बचावासाठी भारतीय उपाय, इस्राईलच्या पंतप्रधानांचा 'हा' सल्ला