नवी दिल्ली : हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या आशियातील देशांमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. भारतात देखील कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या कोविड डॅशबोर्ड नुसार देशात गेल्या आठवड्यात 58 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 93 इतकी झाली आहे. भारतात करोना चाचण्यांची संख्या कमी आहे अशा वेळी रुग्णसंख्या वाढलेली आहे. काही रुग्णांमध्ये व्हायरल ताप आणि कोरोना सारखी लक्षणं आढळून येत असताना त्यांच्या कोरोना तपासणी चाचण्या करण्याचा सल्ला दिला जात नसल्याचं चित्र आहे. मात्र, डॉक्टर्स आणि आरोग्य तज्ज्ञांनी लोकांना घाबरण्याऐवजी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्य कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, घाबरण्याची आवश्यकता नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार सतर्क आहे. सध्या नव्या मार्गदर्शक सूचना आणि योजना लागू करण्याची आवश्यकता नाही.
हाँगकाँग, सिंगापूरमध्ये करोना रुग्णांची वेगानं वाढ
हाँगकाँग, सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळं रुग्णसंख्या वाढली आहे. रिपोर्टस नुसार सिंगापूरमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत 28 टक्क्यांची वाढ झाली असून रुग्णसंख्या 14200 वर पोहोचली आहे. हाँगकाँगमध्ये कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. चाचण्यांचं प्रमाण 13.66 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमध्ये रुग्णांची नोंद
संयुक्त राष्ट्रांच्या कोरोनाच्या टास्क फोर्सचे स्ट्रॅटेजिस्ट आणि सार्वजनिक आरोग्य आणि आरोग्य सर्व्हिसेसचे सल्लागार सबाइन कापसी यांनी भारतात कोरोनाची स्थिती स्थिर आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी आहे. केरळ, तामिळनाडू या सारख्या राज्यात अधिक तपासणी होत असल्यानं तिथं संख्या अधिक असल्याचं ते म्हणाले.
कोरोना डॅशबोर्डच्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या आठवड्यात 58 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 85 टक्के रुग्ण म्हणजेच 46 रुग्ण तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमधील आहेत. मने आए हैं।
गुरुग्राम येथील सी के बिर्ला हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिनचे कन्सलटंट डॉ. तुषार तायल यांनी भारतात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. दररोजचे आकडे कमी आहेत. सध्या सक्रिय कोरोना रुग्णांपैकी 5 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागतं. 2021 मध्ये ही आकडेवारी 20 ते 23 टक्के होती. ते म्हणाले की कोरोनाच्या लक्षणांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना चाचणी करण्याचा सल्ला दिला जात नाही, असं चित्र आहे.