नवी दिल्ली : संपूर्ण देश सध्या कोरोना व्हायरसवरील प्रभावी लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन व्यतिरिक्त भारतातही कोरोना वॅक्सिनवर काम सुरु आहे. देशाच्या 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना कोरोना वॅक्सिनबाबत सांगितलं होतं. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, सध्या एक नाही, दोन नाही तर तीन-तीन भारतीय कोरोना वॅक्सिंग चाचणीच्या टप्प्यात आहेत. जाणून घ्या तीन भारतीय वॅक्सिनबाबत...


भारतात सध्या तीन कंपन्या कोरोना व्हायरसच्या वॅक्सिनवर काम करत आहेत. या कंपन्यांचं लसीच्या मानवी ट्रायलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यावर काम करत आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्यासाठी काही वेळ नक्कीच लागणार आहे. परंतु, जसा तिसरं ट्रायल पूर्ण होईल, त्यानंतर हे वॅक्सिन लोकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.


पंतप्रधान मोदी यांनी तीन कंपन्यांचा उल्लेख केला, जाणून घ्या.




  • भारत बायोटेक आणि आयसीएमआर कोवॅक्सिन (Covaxin) नावाने वॅक्सिन तयार करत आहे.

  • जायडस कॅडिला जायकोव-डी (ZyCoV-D) नावाचं वॅक्सिन तयार करत आहे.

  • सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका एकत्र येऊन कोविशील्ड (AZD 1222) वॅक्सिनवर काम करत आहे.


1. भारत बायोटेक और आईसीएमआर


भारताची पहिली संभाव्य कोरोनावरील प्रभावी लस कोवॅक्सिनचं ह्युमन क्लिनिकल ट्रायल दिल्ली, पटना, भुवनेश्वर, चंडिगढसह देशातील 12 भागांत सुरु आहे. कोवॅक्सिनची निर्मिती भारत बायोटेक, आयसीएमआर आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयवी)ने एकत्र येऊन केली आहे. याची निर्मिती कंपनीच्या हैदराबाद येथील प्लांटमध्ये होणार आहे.


2. जायडस कॅडिला


भारतीय औषध तयार करणारी कंपनी जायडस कॅडिलाने प्लाज्मिड डीएनए वॅक्सिन 'जायकोवी-डी'चं 6 ऑगस्टपासून दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरु करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यातील ट्रायल यशस्वी झालं असून ही लस सुरक्षित असून त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्या वॉलिंटिअर्सला लसीचा डोस देण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्यात सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.


3. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया


सीरम इंस्टीट्यूच ऑफ इंडियाला विश्वास आहे की, ते यावर्षाच्या शेवटी कोरोना वॅक्सिन तयार करतील. सीरम इंस्टीट्यूट एस्ट्रजेनेका ऑक्सफर्ड वॅक्सीनवर काम काम करत आहेत. ज्याचा तिसरा टप्प्यातील क्लिनिकल चाचणी सुरु आहे. भारतात ऑगस्टमध्ये या लसीची मानवी चाचणी सुरु करण्यात येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


कोरोनावरील भारतातील लसींची प्रगती काय? पंतप्रधान मोदी म्हणाले...


पहिल्या टप्प्यातील चाचणीत भारत बायोटेकची कोवॅक्सिन सुरक्षित


Corona Vaccine | कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी भारतातील 'या' कंपन्यांचे प्रयत्न; कधीपर्यंत येण्याची शक्यता?