नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वॅक्सिन एक्सपर्ट पॅनेलने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय) मान्यता देण्याची शिफारस केली आहे. ब्रिटन आणि अर्जेंटिनानंतर ऑक्सफोर्ड लसीला मान्यता देणारा भारत तिसरा देश आहे.


अॅस्ट्रोजेनिकाच्या संयुक्त विद्यमाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 'कोविशिल्ट' लस तयार करत आहे. ऑक्सफोर्डच्या वतीने ही लस तयार केली जात आहे. तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने भारत बायोटेकने 'कोवॅक्सिन' तयार केली आहे, ज्याचे सादरीकरण बुधवारी पॅनेलसमोर करण्यात आले. फाईजरने आपला डेटा सादर करण्यासाठी अधिक वेळ द्यावा अशी मागणी केली.


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासह भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि फायजरने देखील आतपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. सर्वात आधी 9 डिसेंबर रोजी कोरोना लसीसंदर्भात सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची बैठक झाली होती.


कोरोना लसींची सद्यस्थिती


सर्वात आधी 9 डिसेंबर रोजी कोरोना लसीसंदर्भात सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीत, आमच्या डेटाबद्दल अजून माहिती देण्यासाठी आम्हाला आणखी काही वेळ हवा आहे, अशी लेखी विनंती फायजरने केली होती. यानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने फायजरला मुदतवाढ दिली होती.


भारत बायोटेककडेही सर्व माहिती मागितली आहे. सध्या सुरु असलेल्या क्लिनिकल ट्रायलची कार्यक्षमता आणि सुरक्षेची माहिती समितीसमोर सादर करावी, असं भारत बायोटेकला सांगण्यात आलं आहे. यानंतर 17 डिसेंबरला पुन्हा एकदा सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची बैठक झाली ज्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडकडून आणखी माहिती मागण्यात आली, जी जमा करण्यात आली.


30 डिसेंबर रोजी पुन्हा एका कोरोना लसीबाबत एसईसी म्हणजेच सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची बैठक झाली. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, फायजर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक लसीच्या आपत्कालीन वापराबाबत चर्चा झाली. या बैठकीत एसईसीने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून मिळालेल्या अतिरिक्त माहितीवर चर्चा झाली होती.





संबंधित बातम्या

Corona Vaccine | जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवणार, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य