India Coronavirus Vaccine Roll Out नवी दिल्ली : देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. यामध्ये त्यांनी कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा केली. तसेच लसीकरणाबाबत अफवा पसरु नये याची राज्य सरकारांनी काळजी घ्यावी, असं देखील सांगितलं आहे. देशात भारत बायोटेकची Covaxin आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्राजेनेकाची Covishield या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.
या संवादात मोदी म्हणाले की, या लसीकरण अभियानात लस देणाऱ्यांची ओळख आणि मॉनिटरिंग सर्वात महत्वाची आहे. त्यासाठी आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करत को-विन नावाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म देखील बनवला आहे.
Corona Vaccination | पहिल्या टप्प्यात 'या' तीन कोटी लोकांना कोरोना लस दिली जाणार, तपशील जाणून घ्या
केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी व सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली, त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्सच्या डॉक्टर्स च्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लस उपलब्धता, तिची व्यवस्थित वाहतूक, साठवणूक व प्रत्यक्ष लस देणे यासंदर्भात तयारीविषयी माहिती घेतली.
भाजपचे देशव्यापी अभियान
सत्ताधारी भाजपचे नेते नागरिकांमध्ये कोरोना लसीबाबतीत असलेल्या शंकांचे निराकरण करण्यासाठी देशव्यापी अभियान सुरु करण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं होतं की, कोरोनाच्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपतर्फे मोठ्या प्रमाणावर अभियान सुरु करण्यात येणार आहे. देशात कोरोनाच्या लसीची उपलब्धता करुन देणं हे सरकारचं मोठं यश आहे. पक्षाच्या या अभियानाच्या माध्यमातून कोरोनाच्या लसीविषयी लोकांच्या मनात ज्या शंका आहेत त्या दूर केल्या जाणार आहेत. यामध्ये पक्षाचा प्रत्येक नेता सामील होणार आहे.
ब्रिटनकडून आणखी एका कोरोना लसीला मंजूरी, 70 लाख डोसची मागणी
कोरोना लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू होणार असेल तरीही सामान्य लोकांना यासाठी वाट पाहावी लागणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाईल. त्यांच्यानंतर ही लस 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दिली जाईल. देशात लसीकरण सुरू होण्यापूर्वी सरकारने ड्राय रन म्हणजेच देशभरात दोनदा लसीकरणाचा सराव घेण्यात आला.