नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे, मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अशात कोरोनावार कायस्वरुपी उपाय केवळ लसीकरण आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचं आहे. किंबहुना लसींचा मुबलक पुरवठा करणे होणे गरजेचं आहे. त्यात दिलासादायक बातमी म्हणजे कोविशिल्ड, कोव्हॅक्सिननंतर आणखी एक स्वदेशी लस बाजारात लवकरच येण्याची शक्यता आहे. 'कॉर्बेवॅक्स' असं या लसीचं नाव असून या लसीच्या तिसर्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. या लसीसाठी सरकारने हैदराबादस्थित बायोलॉजिकल ई कंपनीला 30 कोटी डोसच्या पुरवठ्यासाठी 1500 कोटी रुपये दिले आहेत.
कॉर्बेवॅक्स लसीचे वैशिष्ट्य म्हणजे स्पाईक प्रोटीनपासून ही बनवली जाणारी ही पहिली कोरोना लस आहे. देशातील इतर लसींच्या तुलनेत सर्वात स्वस्त दरात ही लस उपलब्ध होईल. मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्बेवॅक्स लस एक रिकॉम्बिनेंट प्रोटीन सब युनिट लस आहे. जी कोविड 19 च्या पृष्ठभागावर सापडलेल्या प्रोटीनपासून बनवली जाते. जेव्हा कोरोना व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती त्यास व्हायरस मानून अँटिबॉडीज विकसित करण्यास सुरवात करते. ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता कमी होते. हेपेटायटीस बीची लसही याच तंत्राने वापरली जाते.
कॉर्बेवॅक्स सर्वात स्वस्त लस
आतापर्यंत भारतात फायझर, मोडर्ना, कोविशिल्ड, स्पुतनिक व्ही, कोवॅक्सिन या लसींना मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर लवकरच कार्बेवॅक्स लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. कोविडच्या इतर लसांप्रमाणेच कॉर्बेवॅक्सचे दोन डोस घ्यावे लागतील. मात्र ही लस स्वस्तात उपलब्ध होणार आहे.
लसची किंमत 250 रुपये असू शकते
मिळालेल्या माहितीनुसार, ही लस तयार करण्यासाठी 50 रुपयांपर्यंत खर्च आहे. पण ही बाजारात 250 रुपयांत उपलब्ध होईल. बायोलॉजिकल ई कंपनीने सांगितले की, लसीपासून नफा मिळवणे हे त्यांचे लक्ष्य नाही, तर लोकांची सेवा करणे हे आहे. यामुळे, इतर लसींच्या तुलनेत त्याचे दर कमी ठेवले गेले आहेत.