Corona vaccination: देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून (1 मार्च) सुरू होत आहे. या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या नागरिकांना लसीसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. लसीकरण सरकारी रुग्णालये तसेच काही निवडक खासगी रुग्णालयात होणार आहे. लसीकरणासाठी आजपासून कोविड प्लॅटफॉर्मवर नोंदणी सुरु होणार आहे.  लसीकरणाबाबत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ.


कोरोन लस 250 रुपयात मिळणार


सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाची लस मोफत मिळणार आहे. मात्र खासगी रुग्णालयांसाठी केंद्र सरकारने कोरोना लसीची किंमत निश्चित केली आहे. सरकारने त्याची किंमत 250 रुपये निश्चित केली आहे. खासगी रुग्णालये कोरोनाच्या लसीच्या प्रत्येक डोसाठी 250 रुपये शुल्क आकारू शकतात. म्हणजे एकूण दोन डोससाठी 500 लागतील.


नोंदणी न केल्यास लस मिळणार का?


लसीकरणासंदर्भात यावेळी सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जे नोंदणी करत नाहीत त्यांना लस मिळणार की नाही? ऑनलाईन नोंदणी व्यतिरिक्त लोकांना 'वॉक इन रजिस्ट्रेशन' ची सुविधा देखील देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना मोबाईल जास्त हाताळता येत नाही किंवा ऑनलाईन नोंदणी करता नाही, ते थेट रुग्णालयात जाऊन ही लस घेऊ शकतात. मात्र ऑनलाईन नोंदणी किंवा अॅपद्वारे नोंदणी करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.


Corona | आता कोरोनाची लस गोळ्या आणि स्प्रेच्या स्वरुपात मिळणार, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचा प्रयोग


लसीसाठी आपली नोंदणी कशी करावी


सरकारी अधिसूचनेनुसार, ही लस घेण्यासाठी नागरिकांनी प्रथम को-विन अ‍ॅपवर नोंदणी केली पाहिजे. एकदा नोंदणी झाल्यावर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. यामध्ये लस घेण्याची तारीख, ठिकाण आणि वेळ याविषयी माहिती देण्यात येणार आहे.


Mumbai Corona Update | मुंबईमधील चाळी, झोपडपट्ट्यांची वाटचाल कन्टेन्मेंट झोन मुक्तीकडे


नोंदणीसाठी कोणती ओळखपत्रे वैध असतील?


आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, जॉब कार्ड, मनरेगा कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, खासदार, आमदार व एमएलसी यांनी दिलेली अधिकृत ओळखपत्र इत्यादी ओळखपत्र नोंदणीस वैध असतील.


EXPLAINER VIDEO | एक मार्चपासून कोरोना लस दोनशे पन्नास रुपयात कुठे, कशी आणि कोणाला मिळणार?