नवी दिल्ली : केंद्र सरकारचे कोरोना लसीकरणासंबंधीचे धोरण हे भेदभाव करणार असून त्यामध्ये दुर्बल घटकाला कोरोनाची लस मिळेल याची शाश्वती नाही अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली आहे. गेल्या काही दिवसात लसीकरणाच्या धोरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, "18 ते 45 वर्षामधील लोकांना कोणतीही मोफत लस मिळणार नाही. लसीच्या या किंमतीवर नियंत्रण ठेवायचं सोडून यामध्ये दलालांना वाव देण्यात आला आहे. दुर्बल घटकाला लस मिळेलच याची कोणतीही शाश्वती नाही. केंद्र सरकारचे लसीकरणाचे धोरण हे भेदभाव करणारे आहे."

 

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत केंद्र सरकारने लसीकरणासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व जण लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांचा समावेश होता. तर दुसऱ्या टप्यात 45 वर्षांवरील सर्वांच लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

काँग्रेस नेते सुरजेवाला यांनी दावा केला होता की, 18 वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता लसीची किंमत सरकार नव्हे तर खासगी कंपन्या ठरवणार आहेत. त्यामुळे यापुढे लस आता मोफत नव्हे तर जास्तीत जास्त किंमतीला लोकांना देण्यात येईल. 

महत्वाच्या बातम्या :