Night Curfew in Telangana: तेलंगणा राज्यातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विचार करता राज्यात आज रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नाईट कर्फ्यू येत्या एक मे पर्यंत लागू असेल. त्यानंतर राज्यातील परिस्थितीचा विचार करून पुढचा निर्णय घेणार असल्याचं राज्य सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. 


 






तेलंगणा राज्यात एकाच दिवशी 5926 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. राज्यातील आतापर्यंत 3.61 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत 1856 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


राज्यात आतापर्यंत 3.61 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या चोवीस तासात तेलंगणात 2,029 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ही 3.16 लाख इतकी झाली आहे. राज्यात सध्याच्या घडीला 42,853 लोक उपचार घेत आहेत. सोमवारी एकाच दिवसात 1.22  लाख लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील 1.19 कोटी लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 


देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताच आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या दोन लाख 59 हजार 170 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1761 रुग्णांचा मृत्यू झाला असून हे एका दिवसातील सर्वाधिक मृत्यू आहेत. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संखेत वाढ होऊन 20 लाख 31 हजार 977 एवढी झाली आहे. 


महत्वाच्या बातम्या :