Coronavirus India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताच आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या दोन लाख 59 हजार 170 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1761 रुग्णांचा मृत्यू झाला असून हे एका दिवसातील सर्वाधिक मृत्यू आहेत. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संखेत वाढ होऊन 20 लाख 31 हजार 977 एवढी झाली आहे. 


देशातील आजची कोरोना स्थिती


एकूण कोरोना बाधित रुग्ण : एक कोटी 53 लाख 21 हजार 089
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 31 लाख 08 हजार 582 
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 20 लाख 31 हजार 977
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 80 हजार 530
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 12 कोटी 71 लाख 29 हजार 113 डोस 


आज लस निर्मात्या कंपन्यांसोबत पंतप्रधानांची बैठक 


भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (ICMR) ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात काल संध्याकाळपर्यंत कोरोना व्हायरसच्या एकूण 26 कोटी 94 लाख 14 हजार 35 सॅम्पल्स टेस्ट केले आहेत. त्यापैकी 15 लाख 19 हजार 486 सॅम्पल्स काल टेस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी 6 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लस निर्मात्यांसोबत बैठक करणार आहेत. देशात एक मेपासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना लस देण्यात येणार आहे. 


काल (सोमवार) राज्यात 58924 नवीन रुग्णांचे निदान, तर 52412 रुग्ण कोरोनामुक्त 


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे.  काल (सोमवार)  58  हजार 412 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 52 हजार 412 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 39 लाख 59 हजार 240 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 76 हजार 520 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.04 टक्के  झाले आहे. राज्यात काल एकूण 351 रुग्णांचा काल मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.5६ टक्के आहे. आतापर्यंत एकूण 60 हजार 824 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल नोंद झालेल्या 351 मृत्यूंपैकी 220 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 85 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 46 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :