नवी दिल्ली : भारताने आज जागतिक महामारीच्या विरोधातील आपल्या लढाईत महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. नवीन रुग्णांच्या दैनंदिन संख्येने आज नीचांकी पातळी गाठली आहे. 187 दिवसानंतर गेल्या 24 तासांत राष्ट्रीय संख्येत 16,500 पेक्षा कमी नवीन रुग्णांची (16,432) भर पडली. 25 जून 2020 रोजी 16,922 नवीन रुग्ण आढळले होते. भारतातील उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या आज 2,68,581 पर्यंत खाली आली. एकूण बाधित रुग्णांमध्ये उपचार सुरु असलेल्या रुग्णांचे प्रमाण 2.63 टक्के पर्यंत कमी झाले आहे.


गेल्या 24 तासांत एकूण उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत 8,720 ने घट झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या आणि दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येतील घट यामुळे भारतातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 कोटीच्या जवळ येत आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 98 लाखांच्या (98,07,569) पुढे गेली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 95.92 % झाला आहे. बरे झालेले रुग्ण आणि उपचाराधीन रुग्ण यांच्यातील अंतर वाढत आहे आणि सध्या ते 95,38,988 आहे.


गेल्या 24 तासांत 24,900 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 77.66 टक्के रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत. महाराष्ट्राने काल 4,501 एवढी एका दिवसातील सर्वाधिक बरे झालेल्या रुग्णांची संख्या नोंदवली. केरळमध्ये काल 4,172 रुग्ण बरे झाले. छत्तीसगडमध्ये काल आणखी 1,901 रुग्ण बरे झाले. नवीन रुग्णांपैकी 78.16% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आढळले आहेत.


केरळमध्ये गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक 3,047 नवे रुग्ण आढळले. महाराष्ट्रात 2,498 नवीन रुग्ण तर छत्तीसगडमध्ये 1,188 नवीन रुग्ण काल आढळले. गेल्या 24 तासांत नोंद झालेल्या 252 मृत्यूंपैकी 77.38 % मृत्यू दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाले आहेत. महाराष्ट्रात काल 19.84 टक्के म्हणजे 50 मृत्यूंची नोंद झाली. पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये काल अनुक्रमे 27 आणि 26 मृत्यूची नोंद झाली.