Jyotiraditya Shinde Corona Positive : केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde ) यांना कोरोनाची (corona) लागण झाली आहे. शिंदे यांनी स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं केलेल्या कोविड-19 च्या तपासणीत माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांनी खबरदारी घ्यावी. जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःची चाचणी करुन घ्यावी अशी विनंती ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे.


ज्योतिरादित्य शिंदे हे 16 एप्रिल रोजी ग्वाल्हेरमध्ये आंबेडकर महाकुंभमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही डी शर्मा, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची भेट घेतली होती. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे हे सध्या डॉक्टरांच्या सल्ल्याने विलगीकरणात आहेत. 


 




13 एप्रिलला महाआर्यमन शिंदे कोरोना पॉझिटिव्ह


ज्योतिरादित्य शिंदे यांचे पुत्र महाआर्यमन शिंदे यांनी देखील 13 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना खोकला आणि सर्दीची त्रास झाल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ते सध्या जयविलास पॅलेसमधील विलगीकरणात आहेत. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने संपूर्ण कुटुंब कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 


देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ 


सध्या देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 57 हजारच्या पुढे आहे. मागील 24 तासांत कोरोनामुळं 23 जणांचा मृत्यू झाला आहे.  देशात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण केरळमध्ये आहेत. देशातील पाच राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचाही समावेश आहे. याचबरोबर दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. 


नागरिकांना खबरदारी घ्यावी, प्रशासनाचे आवाहन 


महाराष्ट्रात कोरोनामुळं झालेल्या मृत्यूंमध्ये 71 टक्के रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक असल्याची माहिती आहे. त्यामुळं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिका मात्र, म्हणावी तशी काळजी घेत नसल्याचे चित्र आहे. सध्या केंद्र सरकारकडून कोरोना लशींची पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळं मे महिन्यापर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Corona Update: महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंमध्ये 71 टक्के ज्येष्ठ नागरिक, रविवारी 650 नव्या रुग्णांची नोंद