Wheat Procurement : सध्या देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे तर कुठे अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. या बदलत्या वातावरणामुळं शेतकरी शेतातील कामं उरकून घेत आहे, सध्या देशात गहू (Wheat) काढणीला वेग आला आहे. तर काही शेतकरी (Farmers) विक्रीसाठी गहू बाजारत घेऊन येत आहे. बहुतांश राज्यांमध्ये गहू खरेदी सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात देखील मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी करण्यात येत आहे. राज्यात 60 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
CM Yogi Adityanath : शेतकऱ्यांना बाजारपेठेत अडचण येऊ नये, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचना
ज्या राज्यांमध्ये अद्याप गहू खरेदी सुरु झालेली नाही. तिथे खरेदी तयारी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेश हे देखील असेच एक राज्य आहे, जिथे गहू खरेदी सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार राज्यात गहू खरेदीची तयारी जोरात सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना बाजारपेठेत कोणतीही अडचण येऊ नये, अशा कडक सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 5 हजार 900 खरेदी केंद्रामध्ये ही खरेदी करण्यात येणार आहे.
Wheat : गव्हासाठी 2,125 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव
उत्तर प्रदेशात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड केली जाते. लाखो शेतकरी गव्हाची पेरणी करतात. हंगामात लाखो टन गहू बाजारात विकला जातो. गहू उत्पादनाच्या बाबतीत उत्तर प्रदेश हे मोठे राज्य आहे. उत्तर प्रदेश सरकारनं आता गहू खरेदी धोरण 2023-24 ला मंजुरी दिली आहे. या हंगामात 60 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात येणार आहे. त्याची किमान आधारभूत किंमत (MSP)ही 2,125 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे.
Uttar pradesh : उत्तर प्रदेशमध्ये 5 हजार 900 खरेदी केंद्रे
शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करण्यात कोणतीही अडचण येऊ नये अशा सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत. यासाठी राज्यात एकूण 5 हजार 900 खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रांवर शेतकरी हेल्प डेस्कसह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. राज्य सरकारने रब्बी हंगाम 2023-24 साठी 2,125 रुपये प्रति क्विंटल दराने गहू खरेदी करण्याची घोषणा आधीच केली होती. त्याचीच दखल घेत आता मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये गहू खरेदीचे आदेश जारी केले आहेत. गहू खरेदीमध्ये लहान शेतकऱ्यांची अधिक काळजी घेण्यात आली आहे. 60 क्विंटलपेक्षा कमी गहू विकणाऱ्या शेतकऱ्यांना खरेदीत अधिक महत्त्व दिले जाईल. उत्तर प्रदेशमध्ये 1 एप्रिलपासून गहू खरेदी सुरू करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: