मुंबई : मुंबईत गेले काही दिवस पारा घसरला आहे. सोमवारी सकाळीही थंडीचा जोर पाहायला मिळाला. सध्या मुंबईतील सरासरी किमान तापमान 18 अंश सेल्सिअस आहे. हे तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यात 7 जानेवारीपासून 10 जानेवारी दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार, मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली परिणामी तापमान घसरले आहे. मुंबईतही काही ठिकाणी शुक्रवारपासून पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. मुंबईतील वातावरणात सध्याला गारवा बघायला मिळत आहे. 


मुंबईकरांना पारा 18 अंशांखाली गेला तरी गारव्याची जाणीव होते. मुंबईमध्ये सध्या गारठा आहे. गेल्या आठवड्यात 19 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान होते. त्यानंतर सोमवारपासून पारा आणखी खाली घसरू लागला. तसेच पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. मुंबईतील तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. यंदाच्या ऋतुमधील हे मुंबईतील सर्वात कमी तापमान असेल.


दरम्यान, उत्तर भारतातही थंडीची लाट आली आहे. मुसळधार पावसानंतर, उत्तर भारतातील तापमान 4-6 अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान खात्याने असेही म्हटले आहे की, पुढील 48 तासांत पश्चिम हिमालयीन प्रदेशात आणि पुढील 24 तासांत उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, काही भागात बर्फवृष्टीही होईल.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha