बिहारमध्येही राजदने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही राज्यपालांची भेट घेतली आणि बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली. 'आम्ही सत्तास्थापनेचा दावा करत आहोत. आमच्याकडे अनेक पक्ष आणि आमदारांचं समर्थन आहे' असं पत्र राजद आणि त्यांच्या मित्रपक्षांनी राज्यपालांना दिलं आहे.
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओकराम इबोबी सिंह यांनीही राज्याचे कार्यवाहक राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेतली. राज्यपाल या प्रकरणी न्याय देतील, अशी आशा सिंह यांनी व्यक्त केली.
आता कर्नाटकमध्ये भाजपने फेकलेले फासे भाजपवरच उलटणार का, की त्यातूनही भाजप तिसरा मार्ग काढणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.