पणजी : राजधानी पणजीला लागून असलेल्या पर्वरी मतदारसंघातील सुकुर येथे माजी महसूलमंत्री रोहन खवंटे यांच्या कालावधीत शेतातून बेकायदा रस्ता बांधण्यात आला आहे. क्रिकेटपटू के.एल. राहुल याच्या बंगल्यावर जाण्यासाठी हा रस्ता बांधण्यात आला असल्याचे समोर आले आहे. कोणतीच मान्यता तसेच परवानगी न घेता हा रस्ता बांधण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ता अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अमरनाथ पणजीकर यांनी हा आरोप केला. यावेळी त्यांच्यासोबत पर्वरीचे काँग्रेस समितीचे अध्यक्ष अॅड. शंकर फडते, सुकुर येथील शेतकरी सालेल सिक्वेरा उपस्थित होते. माजी महसूलमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खवंटे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. हा रस्ता पंचायतीच्या अखत्यारीत येतो,त्याचा आपल्याशी काही संबंध नसल्याचे खवंटे यांचे म्हणणे आहे.
जलस्त्रोत खात्याअंतर्गत चार किलोमीटरचा रस्ता दीड कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आला आहे. तसेच हा रस्ता बांधताना कोमुनिदाद तसेच पंचायतकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच नगरनियोजन कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. तसेच याठिकाणी शेतामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु करण्याचा प्रयत्न आहे. या संबंधात मुख्यमंत्री, महसुलमंत्री, जिल्हाधिकारी, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचे यावेळी शंकर फडते यांनी सांगितले.
याप्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. केंद्रात तसेच राज्यात सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतीसाठी कोट्यवधी रुपये राखीव ठेवतो. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे त्यांना काहीच पडलेले नाही. जर शेतीच नष्ट करण्याचे धोरण असेल तर अर्थसंकल्पात शेतीसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्याची गरजच काय? असा सवाल यावेळी काँग्रेसतर्फे करण्यात आला.
क्रिकेटपटू के.एल. राहुलच्या बंगल्यासाठी कायद्याचे उल्लंघन करत दीड कोटी खर्चून रस्ता बनवला : काँग्रेसचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jul 2019 12:31 PM (IST)
राहुलच्या बंगल्यावर जाण्यासाठी हा रस्ता बांधण्यात आला असल्याचे समोर आले आहे. कोणतीच मान्यता तसेच परवानगी न घेता हा रस्ता बांधण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ता अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -