Rajya Sabha Election 2022 : येत्या 10 जूनला राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी विविध राज्यांमधून राज्यसभेचे उमेदवार जाहीर केले जात आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांमध्ये सातत्याने चर्चाही सुरु आहे. दरम्यान, झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या मदतीनं झारखंडमधून काँग्रेसला राज्यसभेची जागा मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन  (Hemant Soren) आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)  यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.


सोनिया गांधी आणि हेमंत सोरेन यांची भेट


सोनिया गांधी आणि हेमंत सोरेन यांच्या भेटीनंतर झारखंडचे मुख्यमंत्री  हेमंत सोरेन म्हणाले होते की, राज्यसभेची जागा कोणाच्या खात्यात जाईल, हे लवकरच तुम्हाला सांगितले जाईल. राज्यसभा निवडणुकीबाबत देशभरात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. झारखंडमध्येही राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. याबाबत आम्ही सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. तसेच झारखंडच्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याची माहिती सोरेन यांनी दिली. मी सोनिया गांधी यांना राज्यसभा निवडणुकीची माहिती दिली. मात्र, यावेळी बोलताना सोरेन यांनी काँग्रेसला एक जागा देण्यास सहमती दर्शवली नाही. मात्र आता समोर आलेल्या माहितीत राज्यसभेच्या जागेबाबत दोन्ही पक्षांमध्ये परस्पर सामंजस्य करार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


झारखंडचे राज्यसभेचे गणित काय 


82 सदस्यीय विधानसभेत 30 आमदार असलेल्या  झारखंड मुक्ती मोर्चानं याआधी निवडणुकीत आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला होता. झारखंडमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. 82 सदस्यांच्या झारखंड विधानसभेत 81 निवडून आलेले सदस्य आहेत. परंतु सध्या, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी झारखंड विकास मोर्चातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले आमदार बंधू तिर्की यांचे सदस्यत्व 28 मार्च रोजी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर संपुष्टात आले आहे. त्यामुळे मतदानासाठी पात्र सदस्यांची एकूण संख्या 80 झाली आहे. त्यामुळेच सध्याच्या विधानसभेत 26.67 टक्के मते मिळविणारा उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे. 


सध्या विधानसभेत सत्ताधारी  झारखंड मुक्ती मोर्चाचे 30 आमदार आहेत, तर काँग्रेसकडे एकूण 17 आमदार आहेत. इतर समर्थक पक्ष आरजेडीकडे एक आमदार आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे एकूण 260 आमदार असून त्यांना किमान दोन आमदारांचा पाठिंबा असल्याची खात्री आहे. अशा स्थितीत राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा प्रत्येकी एक सदस्य निवडून येण्याची शक्यता आहे.


महत्वाच्या बातम्या: