मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Eon Musk) यांच्याकडे आज अधिकृतरित्या ट्विटरचे ( Twitter ) मालकी हक्क मिळाले आहेत. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मस्क यांचे अभिनंदन करत नाव न घेता मोदी सरकाला टोला लगावलाय.एलॉन मस्क यांचे अभिनंदन, आता सरकारच्या दबावामुळे भारतातील विरोधकांचा आवाज दाबला जाणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 


एलॉन मस्क यांनी ट्विटकर विकत घेतले असून आज अधिकृतरित्या त्यांच्याकडे ट्विटरचे मालकी हक्क आले आहेत. त्यामुळे आज त्यांनी ट्विटरच्या मुख्यालयात प्रवेश केला. पहिल्याच दिवशी त्यांनी सीईओ पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवला. मस्क यांच्या मालकीनंतर ट्विटर  मुक्त झाल्याचे बोलले जात आहे. यावरूनच राहुल गांधी यांनी त्यांचे अभिनंदन करत मोदी सरकाला टोला लगावलाय.  


"एलॉन मस्क यांचे अभिनंदन. मला विश्नास आहे की Twitter आता द्वेषयुक्त भाषणांवर कारवाई कराल. शिवाय सत्यता अधिक चोखपणे पडताळली जाईल. सरकारच्या दबावामुळे भारतातील विरोधकांचा आवाज दाबला जाणार नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.  यासोबतच राहुल गांधी यांनी त्यांच्या फॉलोअर्सच्या वाढीचा आलेखही शेअर केला आहे.






ट्विटरने राहुल गांधी यांचे फॉलोअर्स वाढवणे थोड्या काळासाठी थांबवले होते. राहुल गांधींनी शेअर केलेल्या ग्राफमध्ये जानेवारी 2021 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत त्यांच्या फॉलोअर्समध्ये वाढ होत होती. परंतु ऑगस्ट 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत त्याच्या फॉलोअर्सची वाढ थांबली होती. राहुल गांधी यांनी दावा केला आहे की, ट्विटरने त्यांच्या अकाऊंटशी छेडछाड केली आहे. मात्र, फेब्रुवारी 2022 नंतर त्यांचे फॉलोअर्स पुन्हा वाढू लागले.


 गुरुवारी ट्विटर विकत घेण्याचा करार पूर्ण झाल्यानंतर मस्क यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांच्यासह तीन उच्च अधिकाऱ्यांना कामावरून बाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये कंपनीच्या पॉलिसी हेड विजया गड्डे आणि मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचा समावेश आहे. यासोबतच मस्क यांनी त्याचे ट्विटर बायो बदलून मुख्य ट्विट केले आहे.