Ram Mandir | राम मंदिराच्या उभारणीसाठी कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश

अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर (Ram Mandir) उभारणीसाठी रामभक्त आणि सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा केली जात आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी या कार्यासाठी 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा चेक ट्रस्टकडे सोपवला आहे.

Continues below advertisement

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशात वर्गणी गोळा केली जात आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी दिग्विजय सिंह यांनी स्वत: दान दिले असून असून विश्व हिंदू परिषदेने जमा झालेल्या वर्गणीचा हिशोब जनतेसमोर मांडावा अशी मागणी देखील केली आहे.

Continues below advertisement

दिग्विजय सिंह यांनी 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा चेक दिला आहे. अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारणीसाठी वर्गणी जमा करण्याचे काम अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात व्हावे. तसेच विश्व हिंदू परिषदेने जमा झालेल्या वर्गणीचा हिशोब जनतेसमोर मांडावा अशी मागणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

या अगोदर राम मंदिर उभारणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील हातभार लावला आहे.

देशभरातल्या 13 कोटी कुटुंबापर्यंत पोहचण्याचं लक्ष

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेने या वर्गणी अभियानाला सुरुवात केली आहे. हे अभियाने पुढचे दिड महिना चालेल असं सांगण्यात येतंय. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातल्या 13 कोटी कुटुंबापर्यंत पोहचण्याचं लक्ष आहे. या वर्गणी अभियानातून जमा झालेल्या वर्गणीतून अयोध्येत भव्य असे राम मंदिर उभारण्याचा मानस ट्रस्टच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे. या अभियानात 10 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपये अशा स्वरुपात वर्गणी गोळा करण्यात येत असून वर्गणी दिलेल्यांना त्याची पावती तसेच मंदिर आणि भगवान रामाचे एक चित्र देण्यात येणार आहे.

दोन हजारापेक्षा जास्त वर्गणी देणाऱ्या लोकांसाठी वेगळी पावती देण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून संबंधित देणगीदारांना आयकरापासून सूट मिळेल असे ट्रस्टच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी सांगितलं की राष्ट्रपतींच्या हस्ते या अभियानाची सुरवात केल्यानंतर आता उपराष्ट्रपतींचीही भेट घेण्यात येणार आहे. हे अभियान पंतप्रधानांपासून ते देशातील कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिरासाठी वर्गणी अभियानाला सुरुवात, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिले पाच लाख रुपये

 
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola