अरुण जेटली म्हणाले की, "काँग्रेसने ही थिअरी मांडण्यासाठी खोट्या पुराव्यांच्या आधारे निरपराध लोकांविरोधात खटले दाखल केले. परंतु आता न्यायालयाने याप्रकरणी त्यांचा फैसला सुनावल्यानंतर कोण खरं आणि कोण खोटं हे सिद्ध झाले आहे. जे लोक हिंदूंना दहशतवादी म्हणत होते, तेच लोक आता हिंदू धर्माप्रती निष्ठा सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत."
जेटली म्हणाले की, "काँग्रेसने हिंदू समाजाला बदनाम करण्याचे खूप प्रयत्न केले आहेत, त्यामुळे समाज आता त्यांना माफ करणार नाही. हिंदू दहशतवाद हे काँग्रेसने रचलेले षडयंत्र आहे. हिंदू दहशतवाद या शब्दाचा वापर करुन त्यांनी समाजाची प्रतिमा खराब करण्याचे काम केले आहे."
दरम्यान, 20 मार्च रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयाने समझोता बॉम्बस्फोट प्रकरणी फैसला सुनावला. तब्बल 12 वर्षे चाललेल्या या खटल्यातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. त्यामध्ये मुख्य आरोपी स्वामी असीमानंद यांच्यासह कमल चौहान, लोकेश शर्मा आणि राजेंद्र चौधरी या तिघांचा समावेश होता.
18 फेब्रुवारी 2007 रोजी समझोता एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये स्फोट घडवून आणले होते, त्यामध्ये 68 प्रवासी मृत्यूमुखी पडले होते