Congress News : काँग्रेस पक्षाचं नवसंकल्प शिबिर (Congress Nav Sankalp Chintan Shivir)  उदयपूरमध्ये सुरु आहे. काँग्रेस नवसंकल्प शिबिराचा आजचा तिसरा दिवस आहे. आज  काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आहे. गेले दोन दिवस विषयवार समित्या नेमून जी चर्चा झाली आहे त्याबद्दल अंतिम प्रस्ताव तयार करण्याचे काम या बैठकीत होणार आहे. दुपारी 3 वाजता राहुल गांधींचे भाषण असणार आहे तर त्यानंतर सोनिया गांधींच्या भाषणाने शिबिराचा समारोप होणार आहे. दुपारी साडेचार वाजेपर्यंत शिबिराची सांगता होणार आहे. 


नवसंकल्प शिबिरात नेमकं काय काय ठरलं


राहुल गांधी पुढच्या वर्षभरात देशभरातल्या अनेक ठिकाणी जनजागरण यात्रा करणार.


बहुतांश ठिकाणी पदयात्रा


महागाई बेरोजगारी च्या मुद्द्यावर देशभरात शंभर ठिकाणी मेळावे


काँग्रेसमध्ये भाजपच्या धर्तीवर पार्लमेंटरी बोर्ड ही तयार होण्याची शक्यता


हिजाब अजान आणि कलम 370 सारख्या मुद्द्यांवर पक्षाची भूमिका स्पष्ट नव्हती अशा विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी आणि तातडीने रणनीती ठरवण्यासाठी पार्लमेंटरी बोर्डाची रचना


अशा पद्धतीचं पार्लमेंटरी बोर्ड असावं ही जी 23 गटांच्या नेत्यांची सूचना होती


याशिवाय संघटनेत आदिवासी मागासवर्गीय नेत्यांसाठी विशिष्ट टक्के पदं राखीव असावीत असाही सूर


महिलांसाठी सुद्धा संघटनेत आरक्षण आणण्याची तयारी


याशिवाय एक कुटुंब एक तिकीट, संघटनेत एखादी व्यक्ती सलग पाच वर्षेच पदावर असावी, एखाद्या व्यक्तीला राज्यसभेच्या जास्तीत जास्त दोन टर्मच मिळाव्यात अशाही प्रस्तावांवर चर्चा


 धार्मिक मुद्द्यांवरुन दोन गट; पक्षाचा अध्यक्षपदाचा पेच नवसंकल्प शिबिरात सुटणार का?


पक्षाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असलेला पक्षाचा अध्यक्षपदाचा पेच नवसंकल्प शिबिरात सुटणार का? की त्या शिवायच सांगता होणार याचे उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे.  याशिवाय नवसंकल्प शिबिरामध्ये सगळ्यात महत्त्वाची चर्चा धार्मिक मुद्द्यांवर पक्षाची भूमिका यावर झाली.  पक्षाने religious outreach, धार्मिक जनसंपर्क केला पाहिजे अशी संकल्पना मांडण्यात आली.  गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव, ईद यासारख्या कार्यक्रमांमध्ये राजकीय दृष्ट्या नसला तरी नेत्यांचा सार्वजनिक सहभाग दिसला पाहिजे अशी काहींची भूमिका आहे. सॉफ्ट हिंदुत्वावरून पक्षामध्ये दोन गट पडल्याचंही दिसून आलं आहे. भाजपच्या अजेंड्यावर आपण जाण्याची गरज नाही आपण सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष मार्गावरच राहिलं पाहिजे असं काहींचं मत होतं. तर काही नेत्यांनी मात्र आपण आपल्या पद्धतीने हिंदुत्व स्वीकारलं पाहिजे अशी भूमिका मांडली.



इतर संबंधित बातम्या


Congress : काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा सुटणार? कायम सक्रिय असणाऱ्या नेत्याकडे अध्यक्षपद द्या; चिंतन शिबिरात नेत्यांची मागणी


Sonia Gandhi : देशात अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात आहे, लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा : सोनिया गांधी 


Congress : काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात कमालीची सावधगिरी; बैठकीला जाताना मोबाईल लॉकअपमध्ये!


Congress : काँग्रेसचा 'एक परिवार, एक तिकीट' फॉर्म्युला, पण...