IS There Shortage Of Condoms in India: नवी दिल्ली : भारत (National News) हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. अशातच आता काही रिपोर्ट्समधून एक नवा दावा करण्यात येत आहे. येत्या काळात देशात कंडोमची कमतरता (Shortage Of Condoms) भासणार असल्याचा दावा या रिपोर्ट्समधून केला जात आहे.  याचा भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमावर (Family Planning Program) गंभीर परिणाम होईल, असंही बोललं जात आहे. केंद्रीय खरेदी एजन्सी, सेंट्रल मेडिकल सर्व्हिसेस सोसायटी (CMSS), वेळेवर गर्भनिरोधकांचा पुरवठा (Supply of Contraceptives) करण्यात अयशस्वी ठरल्याचाही दावा रिपोर्ट्समधून करण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Ministry of Health) हे वृत्त फेटाळून लावलं आहे. 


भारतात कंडोमचा तुटवडा भासणार असल्याचा दावा काही रिपोर्ट्स करत आहेत. केंद्रीय खरेदी एजन्सी, सेंट्रल मेडिकल सर्व्हिसेस सोसायटी (CMSS) वेळेवर गर्भनिरोधकांचा पुरवठा करण्यात अयशस्वी झाल्यामुळे भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमावर वाईट परिणाम होणार असल्याचंही या रिपोर्ट्समधून सांगण्यात आलं आहे. तसेच, ऑल इंडिया कंडोम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, ज्यामध्ये कंडोम ब्रँड 'निरोध' बनवणारी कंपनी देखील समाविष्ट आहे, त्यांनी सरकारला पत्र लिहून कळवलं होतं की, CMSS कंडोम खरेदी करण्यात अयशस्वी ठरल्याचा दावाही रिपोर्ट्समधून करण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असं वृत्त चुकीचं आणि दिशाभूल करणारं असल्याचं म्हटलं आहे. 


आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे की, सरकारकडे गर्भनिरोधक औषधांचा जो सध्याचा साठा आहे. राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे की, मंत्रालयाच्या विविध कार्यक्रमांसाठी CMSS विविध औषधं आणि वैद्यकीय वस्तू खरेदी करतं आणि त्यांची निविदा प्रक्रिया तसेच, पुरवठ्याच्या स्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जातं.


सरकारकडे कंडोमचा मुबलक साठा 


नवी दिल्लीत CMSS एक स्वायत्त संस्था आहे. जी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. केंद्रीय खरेगी एजन्सी राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी कंडोम खरेदी करते. CMSS ने मे 2023 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी 5.88 कोटी कंडोम खरेदी केले आहेत. सरकारकडे सध्या उपलब्ध असलेल्या कंडोमची संख्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे. सध्या, NACO (National Aids Control Organisation) M/S HLL Lifecare लिमिटेड कंपनीकडून 75 टक्के मोफत कंडोम पुरवठा करत आहे आणि CMSS 2023-24 साठी उर्वरित 25 टक्के कंडोम नुकत्याच मिळालेल्या मंजुरीच्या आधारे पुरवणार आहे. 


M/S HLL Lifecare Limited नं NACO साठी 6.6 कोटी कंडोम दान केले आहेत. कंडोमची ही संख्या सध्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे. तसेच, CMSS च्या खरेदीला विलंब झाल्यामुळे कंडोमचा तुटवडा जाणवला नाही. CMSS ने चालू आर्थिक वर्षात कंडोम खरेदीसाठी आधीच निविदा जारी केल्या आहेत आणि निविदांचं काम अंतिम टप्प्यात आहे. आरोग्य मंत्रालय सध्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्यानं काळजी करण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. निविदा प्रक्रिया, औषधं आणि वैद्यकीय वस्तूंच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रालयाची साप्ताहिक आढावा बैठक आयोजित करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.


पाहा व्हिडीओ : Condom making Factory Aurangabad: ऑटो हब औरंगाबाद आता कंडोम हब, 36 देशांना पुरवठा



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'या' देशात कंडोम बॅन, जगभरातील कोणत्या देशांचा समावेश?