Coimbatore Bomb Blast : कोईमतूर कार ब्लास्टमध्ये मृत तरुणाची 2019 सालीच NIA चौकशी झाल्याची माहिती आता समोर आली आहे. जेमशा मुबीन असे या स्फोटात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. ISIS सोबत संबध असल्याच्या संशयावरून 2019 साली या तरूणाची चौकशी करण्यात आली होती. 23 ऑक्टोबर रोजी तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे एका मंदिरासमोर कारमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेत एका तरूणाचा मृत्यू झाला होता. या मृताच्या घरातून स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याचा संबंध दहशतवादी घटनेशी जोडला जात आहे.
स्फोटा प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. 23 ऑक्टोबर रोजी तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील कोट्टई ईश्वरम मंदिराजवळ पार्क केलेल्या कारमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. त्याचा संबंध दहशतवादी घटनेशी जोडला जात आहे. स्फोटात ठार झालेल्या मुबीनचे ISIS चा दहशतवादी गटाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जाता आहे. याबरोबरच मुबीनचा श्रीलंकेतील स्फोटाशी देखील संबंध जोडला जात आहे.
कोईम्बतूर पोलिसांनी मुबीनच्या घरातून 50 किलो अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम, सोडियम, फ्यूज वायर आणि 7 व्होल्ट बॅटरी जप्त केली आहे. या अपघातात मुबीनचा मृत्यू झाला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तामिळनाडू भाजपचे प्रमुख के. अन्नामलाई यांनी याबाबतची माहिती दिली.
21 ऑक्टोबर रोजी जेमशा मुबीनने ISIS प्रमाणे व्हॉट्सअॅप स्टेटस पोस्ट केला होता. दरम्यान, या प्रकरणी पाच जणांना का अटक करण्यात आली हे पोलिसांनी सांगितले नाही. तमिळनाडू भाजपच्या वतीने आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. पोलिसांनी हा आत्मघातकी हल्ला म्हणून चौकशी करावी अशी मागणी के अन्नामलाई यांनी केली आहे.
तामिळनाडूचे डीजीपी केसी शैलेंद्र बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील स्फोट कमी क्षमतेचा होता. मात्र, राज्य सरकारने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तामिळनाडू भाजपने या संपूर्ण प्रकरणाला दहशतवादी घटना म्हणून संबोधले आहे.
महत्वाच्या बातम्या