लडाख : जम्मू-काश्मीरमधील लडाख प्रदेशातील पँगाँग सरोवर परिसरात घुसखोरीचा दावा फेटाळणाऱ्या चीनचं पितळ उघड पडलं आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी घुसखोरी केल्याचा दावा चीनकडून फेटाळण्यात आला होता. मात्र भारत आणि चीनच्या सैनिकात धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.


भारत-चीन सैनिकांच्या धक्काबुक्कीची ही घटना 15 ऑगस्टची असल्याची माहिती मिळते आहे.

पँगाँग सरोवर परिसरात भारत आणि चिनी लष्कराचे गस्ती पथक आमनेसामने आले होते. यावेळी चीनच्या सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सतर्क भारतीय सेनादलांनी तो वेळीच उधळून लावला.

यावेळी चिनी सैनिकांना अटकाव करताना दोन्ही बाजूंकडून झालेल्या दगडफेकीत काही सैनिक जखमी झाले. काही वेळाने चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत परतले.

व्हिडीओ :