एर्नाकुलम : मातृत्व आणि मातृत्वाच्या वेदना काय असतात ते ती माताच सांगू शकते. असाच एक प्रसंग केरळमध्ये घडला. इतरवेळी खाकी वर्दीतील माणसं म्हटली की त्या भानगडीत पडायलाच नको, अशी भावना प्रबळ झाली असतानाच केरळमधील एर्नाकुलम भागातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने (Civil Police Officer MA Arya from Kochi Women's Police Station) मानवतेचे उदाहरण ठेवले आहे. 


एमए आर्य असे त्या महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव


अवघ्या चार महिन्याच्या बाळाच्या आईची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला आयसीयूमध्ये (ICU of Ernakulam General Hospital) दाखल करण्यात आले. त्यानंतर एका महिला पोलीस अधिकाऱ्याने तिच्या उपाशी असलेल्या मुलाला स्तनपान करून माणूसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. एमए आर्य असे त्या महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या कोची महिला पोलिस स्टेशनच्या सिव्हिल पोलिस अधिकारी आहेत. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने बाळाला आपल्या मांडीवर घेतल्याचे छायाचित्रही पोलिसांनी शेअर केले आहे. ज्याचं लोकांकडून कौतुक होत आहे.


आर्या यांनी ज्या बाळाला स्तनपान केलं त्या बाळाच्या आजारी आईला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि ते मूल भुकेने सतत रडत होते. त्या महिला पोलिस अधिकाऱ्याला सुद्धा नऊ महिन्यांचे बाळ असल्याने त्या स्तनपान करतात. 


पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, पाटणा येथील रहिवासी असलेल्या एका महिलेला एर्नाकुलम जनरल हॉस्पिटलमध्ये (ICU of Ernakulam General Hospital) दाखल करण्यात आले आहे. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या या महिलेला चार मुलं असून काळजी घेणारे कोणीही नाही. त्यामुळे या मुलांना गुरुवारी (23 नोव्हेंबर) 'कोची सिटी महिला स्टेशन' येथे आणण्यात आले.


बाळाचे वडील तुरुंगात 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेचे कुटुंबीय काही काळापासून केरळमध्ये राहत आहेत. महिलेचा पती एका प्रकरणात तुरुंगात आहे. पोलिसांनी तीन मोठ्या मुलांना जेवण दिले, तर चार महिन्यांच्या बाळाला दूध पाजण्याचा निर्णय स्वत: पोलिस अधिकाऱ्याने घेतला. शहर पोलिसांनी आर्या यांचे कौतुक केले आहे. पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, त्यांच्या आरोग्याची खात्री करण्यासाठी, मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या