Gold Silver Price: दिवाळीचा सण संपला आहे. आजपासून देशात लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. लग्नाचा हंगाम सुरु होताच सोन्या-चांदीची (Gold Silver Price) मागणी अचानक वाढली. आहे. दरम्यान, तुम्ही जर सोन्या चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने 61,000 च्या वर व्यवहार करत आहे. तर चांदी 73,000 रुपयांच्या खाली पोहोचली आहे. सध्या फ्युचर्स मार्केटमधील नवीनतम दर काय आहेत ते जाणून घेऊयात. 


सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ


आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, वायदे बाजारात सोने कालच्या तुलनेत 78 रुपयांच्या वाढीसह सध्या 61,150 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. काल सोन्याचा दर 61,072 रुपये होता. आज चांदीच्या दरात देखील किंचित वाढ झाली आहे. चांदीच्या किंमतीत 18 रुपयांनी वाढली आहे. सध्या ती 72,916 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव 72,901 रुपये होता. 


आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ


आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 0.09 टक्क्यांच्या वाढ झाली आहे. त्याचवेळी, चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात 0.01 टक्क्यांची वाढ झाली आहे.


जाणून घ्या प्रमुख शहरांमधील सोन्या- चांदीचे दर 


दिल्ली- 24 कॅरेट सोने 62,120 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,200 रुपये प्रति किलोग्रॅम 
मुंबई- 24 कॅरेट सोने 61,970 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,200 रुपये प्रति किलोग्रॅम 
कोलकाता- 24 कॅरेट सोने 61,970 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,200 रुपये प्रति किलोग्रॅम 
चेन्नई- 24 कॅरेट सोने 62,500 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 79,200 रुपये प्रति किलोग्रॅम 
गाझियाबाद- 24 कॅरेट सोने 62,120 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,200 रुपये किलो 
पुणे- 24 कॅरेट सोने 61,970 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,200 रुपये किलो 
नोएडा- 24 कॅरेट सोने 62,120 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,200 रुपये प्रति किलो 
पाटणा- 24 कॅरेट सोने 62,020 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,200 रुपये किलो 
जयपूर- 24 कॅरेट सोने 62,120 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,200 रुपये किलो
लखनौ- 24 कॅरेट सोने 62,120 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,200 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.


लग्नसराईत सोने खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा


सोने खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला फसवणुकीपासून वाचवू शकता. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर सर्व प्रथम त्या दागिन्यांवर सहा क्रमांकाचा हॉलमार्क आहे का ते तपासा. नियमानुसार कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकू शकत नाही.


महत्त्वाच्या बातम्या:


एकीकडं लग्नाचा हंगाम सुरु, दुसरीकडं सोन्या-चांदीला झळाळी, जाणून महत्वाच्या शहरातील आजचे दर