Chhattisgarh Assembly Election Opinion Poll and Survey : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये या वर्षाअखेर विधानसभा निवडणूक होत आहे. पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीअगोदर एबीपी न्यूज आणि सी व्होटरने सर्वात मोठा ओपिनियन पोल केला आहे. कोणत्या राज्याचा कौल कुणाला, ते यातून स्पष्ट होणार आहे.
एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, गेल्या 15 वर्षांपासून ताब्यात असलेलं छत्तीसगड भाजपच्या हातून जाण्याची शक्यता आहे. या सर्व्हेनुसार, भाजपला 39 टक्के, काँग्रेसला 40 टक्के आणि इतरांना 21 टक्के मतं मिळत आहेत.
एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, 90 जागा असणाऱ्या छत्तीसगड विधानसभेत काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचं चित्र आहे. भाजपला 33, काँग्रेसला 54 आणि इतरांना तीन जागा मिळताना दिसत आहेत.
छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रमन सिंह यांना 34 टक्के, अजित जोगी 17 टक्के आणि भूपेश बघेल यांना नऊ टक्के जनतेने पसंती दिली आहे.
लोकसभेसाठी मोदीच!
विधानसभेत राज्य भाजपच्या हातून दिसत असलं तरी केंद्रात जनतेने मोदींनाच कौल दिला आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, भाजपला लोकसभेसाठी 46 टक्के, काँग्रेसला 36 टक्के आणि इतरांना 18 टक्के मतं मिळताना दिसत आहेत.
एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींनाच पहिली पसंती आहे. नरेंद्र मोदींना छत्तीसगडमधील 56 टक्के जनतेने पसंती दिली आहे. तर 21 टक्के जनता राहुल गांधींच्या बाजूने आहे.
छत्तीसगडमधील चित्र काय?
छत्तीसगड विधानसभेत 90 आणि लोकसभेच्या 11 जागा आहेत. 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 49 आणि काँग्रेसने 39 जागांवर विजय मिळवला होता. तर 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत 10 जागा भाजपला आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती. डॉ. रमन सिंह 7 डिसेंबर 2003 रोजी मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले.
सर्व्हे कसा झाला?
या सर्वेक्षणाअंतर्गत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील 27 हजार 968 लोकांशी बातचित केली गेली. तीन राज्यांच्या सर्व 65 लोकसभा जागांवर एक जून ते 10 ऑगस्ट या दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्रासह 11 राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबतच : सूत्र
म. प्र. ओपिनियन पोल : काँग्रेसला बहुमत, भाजपच्या हातून राज्य जाणार?
छत्तीसगड ओपिनियन पोल : 15 वर्षांनंतर भाजपच्या हातून सत्ता जाण्याची चिन्हं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2018 08:22 PM (IST)
Chhattisgarh Election Opinion Poll, Survey : पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीअगोदर एबीपी न्यूज आणि सी व्होटरने सर्वात मोठा ओपिनियन पोल केला आहे. कोणत्या राज्याचा कौल कुणाला, ते यातून स्पष्ट होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -