बिलासपूर : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात 11 सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. भेज्जी परिसरात आज सकाळी सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.

सर्व शहीद जवान सीआरपीएफच्या 219 व्या बटालियनचे होते. ही घटना आज सकाळी 9 च्या सुमारास घडली.

रस्ते निर्माण सुरक्षेसाठी असलेल्या जवानांना निशाणा साधत नक्षलवाद्यांनी सुरुवातीला आयईडी ब्लास्ट केला, त्यानंतर अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी 9 जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

इतकंच नाही तर नक्षलवाद्यांनी जवानांची हत्यारं, रेडिओ सेट आणि इतर सामान लूटलं.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुकमामधील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करत शोक व्यक्त केला. तसंच जखमी जवानांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्याची प्रार्थना केली. तसंच गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बातचीत करुन सुकमामधील परिस्थितीचा आढावा घेण्याचं आश्वासन दिलं.

https://twitter.com/narendramodi/status/840457393666437120

https://twitter.com/narendramodi/status/840457619269668864