नवी दिल्ली : पैलवान सागर धनकड हत्याप्रकरणी पैलवान सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे. सागर धकडला हॉकी स्टीकने मारहार करताना सुशील कुमारचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणी सुशील कुमारचा आणखी एक साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, आपण त्या वेळी स्टेडियममध्ये उपस्थित नव्हतो असं अटक केलेल्या पहिल्या दिवसापासून पैलवान सुशील कुमार सांगतोय. पण समोर आलेल्या या व्हिडीओमधून सुशील कुमार खोटं बोलत असल्याचं स्पष्ट झालंय. एका हॉकी स्टीकने सुशील कुमार हा सागर धनकडला मारहाण करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सुशील कुमारला अडवण्यासाठी अनेकजण येत आहेत पण त्या सर्वांना बाजूला करुन सुशील कुमार हा सागरला मारताना दिसतोय.
या वेळी सुशील कुमारकडे एक पिस्तुल असल्याचं सांगण्यात येत होतं. या व्हिडीओमध्ये एक पिवळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला व्यक्ती अशी पिस्तुल हातात घेऊन स्टेडियममध्ये वावरताना दिसतोय.
समोर आलेला हा व्हिडीओ पैलवान सागर धनकड हत्येप्रकरणी मोठा पुरावा मानला जात आहे. हा पुरावा आता पोलीस न्यायालयात सादर करणार आहेत. तसेच या व्हिडीओत दिसणाऱ्या सर्वांच्या साक्षीही घेण्यात येतील. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेची कोणतीही माहिती अद्याप तरी पोलिसांनी दिली नव्हती. पैलवान सुशील कुमार विरोधात ठेवण्यात आलेल्या आरोपांना सिद्ध करण्यासाठी आता हा व्हिडीओ खूप महत्वाचा असल्याचं सांगण्यात येतंय. सुशील कुमार तिथे होता आणि तो सागर धनकडला मारहाण करत होता हे या व्हिडीओतून स्पष्ट झालं आहे.
छत्रसाल स्टेडियममध्ये 23 वर्षीय कुस्तीपटू सागर धनखरच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्लीच्या रोहिणी कोर्टानं सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवलं आहे. सुशीलचा साथीदार अजय यालाही कोर्टाने 6 दिवसांच्या पोलीस रिमांडवर पाठवलं आहे.
20 दिवसानंतर दिल्लीच्या मुंडका येथून आरोपीला अटक
ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजय यांना 20 दिवसानंतर अटक करण्यात आली आहे. आपल्या साथीदाराबरोबर एकाला भेटायला स्कूटीवर जात असताना सकाळी सुशील कुमार व त्याचा साथीदार अजय याला दिल्ली पोलिसांनी मुंडका मेट्रो स्टेशनवरून अटक केली.
कुस्तीपटू सागर धनखरच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत आहेत. सुशील कुमारचा संबंध काही गॅंगस्टरशी असल्याची माहिती पोलीस तपासातून पुढं येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
पहा व्हिडीओ : Chhatrasal Stadium Case : सागर धनकड हत्याप्रकरणाचा व्हिडीओ समोर, सुशील कुमार मारहाण करत असल्याचं उघड
महत्वाच्या बातम्या :
- Cyclone Tauktae : तोक्ते तक्रीवादळाचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यालाही फटका
- Mumbai on Corona Crisis : कोरोना लसीसाठी बीएमसीचं जगातील सहा सिस्टर सिटीजना पत्र, 1 कोटी 80 लाख डोसची मागणी
- IND vs NZ, Test Championship Final : सामना 'ड्रॉ' किंवा 'टाय' झाल्यास अशी होणार विजेत्याची घोषणा, ICC कडून नियम-अटींची घोषणा