Chennai Rains :चेन्नई, तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) सध्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, सैदापेठ परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाचे छत कोसळले. या अपघातात 7 जण जखमी झाले आहेत.


 


 






 


 


चेन्नईमधील दुर्घटना


तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये सध्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे.  शुक्रवारी मुसळधार पावसात चेन्नईच्या सैदापेट भागात असलेल्या पेट्रोल पंपाचे छत कोसळले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. यानंतर तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम सुब्रमण्यम यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींवर उपचार सुरू असल्याचे सुब्रमण्यम यांनी सांगितले.


 






 


 



मृत व्यक्ती हा पेट्रोल पंपाचा कर्मचारी
या अपघातात कंधासामी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे चेन्नई पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्ती हा पेट्रोल पंपाचा कर्मचारी होता. या घटनेनंतर अग्निशमन दलासह पोलीस, महापालिका कर्मचारी तसेच स्थानिक लोक मदत आणि बचावकार्यात गुंतले होते. या पेट्रोल पंपाच्या छतावर मुसळधार पावसामुळे आधीच पाणी साचल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत पावसाचा जोर अधिक असताना छतावर अधिक भार पडला होता, तो सहन न झाल्याने छत अचानक खाली पडले.


 


 






 


पावसामुळे रस्त्यांवर जाम
तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तर चेन्नईमध्ये काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे रस्ते ठप्प झाले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.