Char Dham Yatra 2023: चार धाम यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात, उत्तराखंडमधील सात जिल्ह्यात आज मॉकड्रिल

Char Dham Yatra 2023:  चार धाम यात्रा धार्मिक ग्रंथात शुभ मानली गेली आहे.   एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यात्रेला सुरुवात होणार आहे.

Continues below advertisement

Char Dham Yatra 2023: उत्तराखंडमधील (Uttarakhand) चार धाम यात्रेची (Char Dham yatra 2023) तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली  आहे.  बद्रीनाथ(Badrinath) , केदारनाथ (Kedarnath), गंगोत्री (Gangotri) आणि यमुनोत्रीची (Yamunotri) यात्रा लवकरच सुरू  होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज मॉकड्रिल घेण्यात येणार आहे.  नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर केदारनाथ परिसराची भौगोलिक परिस्थिती बदलली आहे.  दरम्यान, या पार्श्वभूमीवर उत्तराखंडच्या सात जिल्ह्यामध्ये  मॉकड्रिलचे  घेण्यात येणार आहे. यादरम्यान  पायाभूत सुविधा,  नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आल्यानंतर करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासह अनेक गोष्टींचा आढावा घेतला जाणार 

Continues below advertisement

 चार धाम यात्रा धार्मिक ग्रंथात शुभ मानली गेली आहे. चार धामच्या दर्शनाने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो.   एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यात्रेला सुरुवात होणार आहे. मंदिर कमिटीने दिलेल्या माहितीनुसाक गंगोत्री, यमोनत्रीचे दरवाजे 22 एप्रिल, केदरनाथचे 26 एप्रिल आणि बद्रिनाथचे दरवाजे 27 एप्रिलला उघडण्यात येणर आहे.  या पार्श्वभूमीवर तयारीच आढावा घेण्यासाठी आज उत्तराखंडच्या सात जिल्ह्यात मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. चमोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, डेहराडून, हरिद्वार, पौडी आणि तिहरी येथे मॉकड्रिल करण्यात येणार आहे. या मॉकड्रिलमधये जिल्हा प्रशासन, आर्मी, एसएसबी, आयटीबीपी, सीआयएसएफ, सीआरपीएफ, वायूसेना यांच्यातील सम्न्वय यांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच एनडीआरएफचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

उत्तराखंड सरकारने आता चारधाम यात्रेसाठी 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी अनिवार्य केली आहे. यात्रेच्या मार्गावर 50 हेल्थ एटीएमची व्यवस्था करण्यात आली आहे.  या वेळी चार धाम यात्रेत प्रवाशांची तपासणी तीन पद्धतीने  करण्यात येणार आहे. रिस्ट बँड, फिजिकल आणि क्यूआर कोडसह तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणीसाठी प्रवाशांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागत होते.

4 मे पासून सुरू होणार मानसरोवर यात्रा

4 मे पासून मानसरोवरच्या यात्रेला प्रारंभ होणार आहे.  या यात्रेसाठी 102 यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे. कुमाऊ विकास मंडळाने यात्रेची तयारी सुरू केली आहे. तसेच पाच सदस्यांच्या एका टीमने बूंदी, गुंजी, कालापानी आणि नाभीढांग येथे पाहणी केली.  कुमाऊ विकास मंडळाने  यात्रेचा संपूर्ण कार्यक्रम जारी केला आहे. तसेच यात्रेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन बुकिंग देखील सुरू करण्यात आली आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या :

उत्तराखंडमध्ये बसवली आशियातील सर्वात मोठी दुर्बीण, अवकाशातील अनेक रहस्य उलगडणार

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola