IMD Weather News : देशातील हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. काही भागात थंडीचा कडाका जाणवत आहे, तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी आणि धुक्याचा त्रास हळूहळू कमी होत आहे. तर काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता जाणावत आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, आज अरुणाचल प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता आहे. यासोबतच आज किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्लीत थंडी कायम
देशाची राजधानी दिल्लीत हवामान पूर्ण निरभ्र आहे. त्या ठिकाणी उष्णतेत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून धुकेही कमी होत आहे. सूर्यप्रकाश आणि धुके कमी होऊनही थंडी कायम आहे. या थंडीचे कारण म्हणजे दिल्लीत येणारे थंड वारे. हे वारे डोंगरावरून दिल्लीच्या दिशेनं येत आहेत. काल राष्ट्रीय राजधानीत किमान तापमान आठ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हंगामाच्या सरासरीपेक्षा हे एक अंश कमी आहे. राज्यात जाणवणारी उष्णता काही दिवस राहणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार ते पाच दिवसांत दिल्लीत पाऊस पडू शकतो. पावसानंतर राष्ट्रीय राजधानीतील किमान तापमानात पुन्हा घसरण होऊ शकते. एकूणच, हिवाळा अद्याप पूर्णपणे निघून गेलेला नाही. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत आज हवामान पूर्णत: स्वच्छ राहणार आहे. तर हरियाणा, पंजाब आणि चंदीगडमध्ये थंडीच्या लाटेमुळं दोन दिवस किमान तापमानात पुन्हा घसरण होणार आहे. दोन्ही राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये आज सकाळी हलके धुकेही दिसत आहे.
11 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडी कायम राहणार
महाराष्ट्रातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. कुठं थंडीचा कडाका वाढत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, 11 फेब्रुवारी (रविवार) पर्यंत महाराष्ट्रात मध्यम थंडीचा दिलेला अंदाज कायम असल्याची माहिती जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली. तर ढगाळ वातावरणाने थंडी काहीशी कमी झाली आहे. सध्या कमाल व किमान दोन्हीही तापमाने सरासरीपेक्षा वाढीव असली तरी असली तरी रात्री व पहाटे थंडी ही जाणवत आहे.
महत्वाच्या बातम्या:
महाराष्ट्रात कुठं ढगाळ वातावरण तर कुठं पावसाची शक्यता, कसं असेल राज्यातील हवामान?