Chandrayaan-3 LVM III Rocket Part : भारताच्या महत्तवाकांक्षी चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चं प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडलं. इस्रोच्या या तिसऱ्या चंद्र मोहिमेमुळे भारतीयांची छाती गर्वानं फुलली आहे. आता हे चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचल्यावर इस्रोच्या या मोहिमेचं खरं उद्दीष्ट पूर्ण होणार आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेनं यशस्वीपणे झेपावलं. ही देशासाठी आणि सांगलीकरासाठीही अभिमानास्पद बाब आहे. चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणात सांगलीचाही मोलाचा वाटा आहे.  चांद्रयान-3 च्या रॉकेटच्या पार्ट्सचं महत्त्वपूर्ण कोटिंगचं काम सांगलीमध्ये करण्यात आलं आहे. 


चांद्रयान-3 साठी सांगलीचीही मोलाची कामगिरी!


श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रावरून  शुक्रवारी चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेनं यशस्वीपणे झेपावलं. चांद्रयान-3 चं प्रक्षेपण इस्रोच्या बाहुबली रॉकेट म्हणजेच LVM-3 रॉकेटद्वारे करण्यात आलं. या GSLV MK-III रॉकेटच्या पार्ट्सचं महत्त्वपूर्ण कोटिंगचं काम सांगलीतील उद्योजक संदीप सोले यांच्या डॅझल डायनाकोएट्स प्रायव्हेट लिमिटेड (Dazzle Dynacoates Pvt. Ltd.) या फॅक्टरीत पार पडलं. ही बाब महाराष्ट्राची आणि त्याचबरोबर सांगलीकराची मान उंचावणारी आहे. 


सांगलीमध्ये झालंय चांद्रयान-3 च्या रॉकेटच्या पार्ट्सचं काम 


चांद्रयान-3 च्या जीएसएलव्ही यानाचा एक भाग सांगलीजवळील माधवनगरमध्ये असलेल्या डझल डायनाकोटस या खासगी कारखान्यात तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी श्रीहरीकोटा येथील केंद्रामधून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इस्रोच्या चांद्रयान-3 चे यशस्व प्रक्षेपण करण्यात आले. या सुवर्णक्षणाचं प्रक्षेपण अनेक भारतीयांना टीव्हीवर लाईव्ह पाहिले. या यशस्वी कामगिरीबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे जगभरातून कौतुक करण्यात आले. अंतराळ यानाला प्रक्षेपणानंतर जे इंधन आवश्यक आहे. ते तयार करण्यात येणार्‍या भागाला संरक्षण आणि साठवण करणार्‍या उपकरणाची निर्मिती सांगलीतील कारखान्यात करण्यात आली आहे.


LVM3 रॉकेटच्या पार्ट्सचं महत्त्वपूर्ण कोटिंगचं काम


चांद्रयान-3 मध्ये वापरण्यात आलेला भाग सांगलीतील कारखान्यात दीड वर्षापूर्वी तयार करण्यात आला आहे. सध्या गगनयानमध्ये वापरण्यात येणार्‍या उपकरणाची निर्मिती सुरू आहे. यापूर्वी पीएसएलव्ही अंतराळ यानासाठीही याच ठिकाणी हा सुटा भाग तयार करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगीकरणाच्या धोरणानुसार अंतराळ संशोधनामध्येही  खासगीकरण सुरू आहे. यानुसार एका खासगी कंपनीसाठीही उपकरण तयार करण्यात आला आहे. 


अंतराळयान प्रक्षेपण केंद्रावरून बाहेर पडल्यानंतर मोठी आग दिसते, यानामध्ये त्या ठिकाणी या भागाचा वापर करण्यात येतो. या ठिकाणी गेली तीस वर्षे अशा पध्दतीचे उपकरण तयार करण्यात येत आहे. यामुळे अंतराळ यानाच्या उत्पादन खर्चातही कपात झाली असल्याचे डझल डाचनाकोटसे संचालक संदीप सोले यांनी सांगितलं आहे. डॅझल डायनाकोएट्स प्रायव्हेट लिमिटेड (Dazzle Dynacoates Private Limited) या कंपनीमध्ये गेली तीस वर्षे केवळ संरक्षण आणि अंतराळ संशोधन केंद्रासाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचे काम होत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर कधी उतरणार? इस्रोच्या प्रमुखांनी सांगितली तारीख; कसा असेल चंद्रापर्यंतचा 40 दिवसांचा प्रवास?