Swami Chakrapani On Chandrayaan 3 : चंद्राला हिंदू सनातन राष्ट्र म्हणून घोषित करावं अशी मागणी हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी (Swami Chakrapani) यांनी केली आहे. संसदेत यासाठीचा प्रस्ताव पारीत करावा असेही ते म्हणाले. तर जिथं चांद्रयान-3 ची सॉफ्ट लँडिग झाली, त्या शिवशक्ती पॉईंटला राजधानी म्हणून विकसित करावं. जेणेकरुन कोणी दहशतवादी किंवा जिहादी मानसिकता असलेले तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही, असं स्वामी चक्रपाणी यांनी म्हटलंय. तसेच शिवशक्ती पॉइंटवर भगवान शिव, माँ पार्वती आणि भगवान गणेशाचे भव्य मंदिर बांधावे असेही ते म्हणाले.


देशभरात सध्या चांद्रयान3 मोहिमेची चर्चा


चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग केले. चांद्रयान-3ने यशाला गवसणी घातल्यानंतर संपूर्ण भारतात जल्लोषाचं वातावरण आहे. कारण चंद्राच्या दक्षिण धुव्रावर पोहोचणारा भारत पहिलाच देश आहे. अशातच ज्या ठिकाणी चांद्रयान-3ची लँडिग झाली त्या जागेला शिवशक्ती पॉइंट नावाने ओळखले जाणार आहे. देशभरात सध्या चांद्रयान 3 मोहिमेची चर्चा असतानाच हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. चंद्राला हिंदू सनातन राष्ट्र म्हणून घोषित करावं अशी मागणी त्यांनी केलीय.


 



शिवशक्ती पॉइंटकडे शिवशक्ती धाम म्हणून पाहत आहोत


आम्ही शिवशक्ती पॉइंटकडे शिवशक्ती धाम म्हणून पाहत आहोत. हिंदू महासभा, संत महासभेच्या वतीने मी सरकारला विनंती करतो की, त्यांनी चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं. तसेच शिवशक्ती पॉइंटला त्याची राजधानी करण्याचे पत्रही पाठवत आहे. तसेच शिवशक्ती पॉइंट येथे भगवान शिव, माँ पार्वती आणि भगवान गणेशाचे भव्य मंदिर बांधावे असेही स्वामी चक्रपाणी म्हणाले. 


दरम्यान, चांद्रयान3 मोहिम यय़स्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांचे अभिनंदही केले. 2019 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी चांद्रयान-2 ने आपल्या पावलांचे ठसे सोडले त्या ठिकाणाला तिरंगा पॉईंट म्हटले जाईल. तर 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतरळा दिन म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली  आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा परदेश दौरा आटोपून थेट इस्रो शास्रज्ञांच्या भेटीसाठी बंगळुरुला गेले. तिथे जाऊन त्यांनी इस्रोच्या शास्रज्ञांचे तोंडभरुन कौतुक केलं. तसेच त्यांनी यावेळी चांद्रयान-3 ची दृश्य देखील पाहिली. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयानाचे लँडिंग झाल्यानंतर इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांच्याशी फोनवरुन देखील संवाद साधला होता. 


महत्त्वाच्या बातम्या:


Chandrayaan-3 : चांद्रयान-3 च्या लँडिगनंतरचं चंद्रावरील पहिलं दृष्य! विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर नेमका बाहेर कसा पडला? इस्रोने शेअर केला खास व्हिडीओ