मुंबई : अवघ्या काही तासांत नवा इतिहास रचला जाणार आहे. इस्रोच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3 Landing ) बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान-3च्या लँडिंगसाठी पोषक वातावरण असल्याने चंद्रावर लँडिंगचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं इस्रोनं सांगितलं आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांनी 06 वाजून 04 मिनिटांनी इस्रोचं चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिगचा प्रयत्न करणार आहे. 


चांद्रयान-3 मोहिमेतील सर्वात मोठं आव्हान म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणं हे आहे, यासोबतच इतरही काही आव्हानं आहे, याबाबत सविस्तर जाणून घ्या.


चांद्रयान-3 मोहिमेचे टप्पे




    • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅण्डिंग

    • यान रोव्हर लॅण्डरपासून वेगळं होणार

    • रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालणार

    • पृष्ठभागावरच्या अनेक गोष्टींची माहिती संकलन

    • काढलेले फोटो इस्रोच्या केंद्राकडे पाठवणे







चांद्रयान-3 मोहिमेसमोरील आव्हानं


1. 25 किमीवरून चंद्रावर उतरणे


25 किलोमीटर अंतरावरून वेग आणि उंची कमी करत सुरक्षित चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणे, हे या मोहिमेतील मोठं आव्हान आहे. अलिकडेच रशियाचं लुना-25 अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर आदळून कोसळलं आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा चांद्रयान-3 कडे लागल्या आहेत.


2. चंद्रावरील सुरक्षित भागात लँडिग


चांद्रयान-3 समोरील आणखी एक आव्हान म्हणजे चंद्रावरील सुरक्षित भागात लँडिंग करणे. चंद्रावरील सुरक्षित भागात लँडिंग करणे फार महत्वाचं आहे. कारण, त्यानंतर विक्रम लँडरमधील प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून माहिती गोळा करणार आहे. फायरिंग इंजिनद्वारे लँडिंग केल्याननंतर गरम वायू आणि धूळ यांचा लँडर आणि रोव्हरवर परिणाम होऊन व्यत्यय येऊ शकतो.


3. सेट केलेली वेळ, वेग पाळणं


चांद्रयान-3 ने लँडिंगसाठी सेट केलेली वेळ आणि वेग पाळणे फार महत्त्वाचं आहे. हे करण्यात चांद्रयान अपयशी ठरलं तर चांद्रयान-3 चं लँडिंग पुढे ढकलावं लागेल. 


4. चंद्रावरील हवामानाचा परिणाम


चंद्रावरील हवामानही अतिशय थंड आहे, त्याचा रोव्हरवर परिणाम होऊ शकतो. चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर दिवसा 54 अंश सेल्सिअस ते रात्री -203 अंश सेल्सिअस तापमानाला सामोरे जातील. याचाही मोहिमेवर परिणाम होऊ शकतो.


संबंधित इतर बातम्या : 


Chandrayaan-3 Landing : भारताची चांद्रयान-3 मोहिम इतिहास घडवणार! लँडिंगचा क्रम कसा असेल? जाणून घ्या...