चंदीगड : गेल्या काहीत जगातल्या लठ्ठ महिला आणि पुरुषाची सर्वत्र चर्चा होती. यातील इजिप्तच्या इमान अहमदनं दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर 50 टक्क्यांहून अधिक वजन घटवलं. तर जगातला लठ्ठ पुरुष ठरलेल्या मॅक्सिकोच्या जुआनचं वजन घटवण्यासाठी 9 मे रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पण आता यात आठ महिन्याच्या मुलीचाही समावेश झाला आहे. पंजाबमध्ये एका आठ महिन्याच्या मुलीचं वजन तब्बल 20 किलो असल्याचं समोर आलं आहे.


या मुलीचं नाव चाहत कुमार असं असून, तिच्या वाढत्या वजनामुळे तिचे कुटुंबिय चिंतेत आहेत. सध्या तिच्या वयोमानानुसार तिला चौपट आहार लागतो. विशेष म्हणजे, डॉक्टरांनाही तिच्या रोगाचं निदान लागलं नाही. तिची त्वचा राकट झाल्याने डॉक्टरांनाही तिच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात अडथळे येत आहेत. या मुलीच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य असल्याने तिच्यावर उपचाराचा प्रश्न उपस्थित होत आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, या मुलीचा जन्म झाला, त्यावेळी तिचं वजन सर्वसामान्य होतं. पण अचानक तिचं वजन वाढू लागल्याचे तिचे वडील सूरज कुमार यांनी सांगितलं. तर तिच्या वाढत्या वजनामुळे तिची आईदेखील चिंतेत आहे.

दरम्यान, तिच्या वजनवाढीमुळे तिला झोपण्यास आणि श्वसनासही त्रास होतो आहे. तिच्या या वजनवाढीमुळे तिच्या कुटुंबियांसोबत डॉक्टरही चिंतेत आहेत.

संबंधित बातम्या

इमान अहमदचं तब्बल 262 किलो वजन घटलं!

595 किलोच्या पुरुषाचं वजन लवकरच घटवणार!

पाच आठवड्यात इमाननं 142 किलो वजन घटवलं

इमानवर यशस्वी शस्त्रक्रिया, पहिला फोटो समोर

शस्त्रक्रियेसाठी मुंबईत आलेल्या लठ्ठ महिलेला क्रेनने उचललं

जगातल्या सर्वात लठ्ठ महिलेचे वजन…