FM Nirmala Sitharaman Announcement: आज अर्थमंत्र्यांनी आठ आर्थिक सुधारणा जाहीर केल्या आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन COVID प्रभावित राज्यांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांची कर्ज हमी योजना घोषित केली आहे. यात आरोग्य क्षेत्रासाठी 50,000 कोटी रुपयांची तर इतर क्षेत्रांसाठी 60,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबत अर्थमंत्र्यांनी पर्यटन क्षेत्रासाठी देखील महत्वाची घोषणा केली आहे. पर्यटन क्षेत्राला कोरोनामुळं मोठा फटका बसला आहे. यातून सावरण्यासाठी मोठी मदत यामुळं होणार आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी 5 लाख पर्यटकांना मोफत व्हिसा देण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. पर्यटन क्षेत्रासाठी मदतीची 11 हजार नोंदणीकृत टूरिस्ट गाईड्स आणि ट्रॅव्हल टुरिझम क्षेत्रातील लोकांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी भागभांडवल म्हणून पर्यटन क्षेत्रातील उद्योगांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची तयारी असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
निर्मला सीतारामन यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा
- कर्ज हमी योजनेअंतर्गत आरोग्य क्षेत्रासाठी 50 हजार कोटी रुपयांची तरतूद.. इतर क्षेत्रांसाठी आणखी 60 हजार कोटी रुपये देणार
- आत्मनिर्भर भारत अंतर्गत 1.5 लाख कोटी रुपयांच्या तातडीच्या तारण हमी योजनेचीही घोषणा
- आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणार... त्याशिवाय 8 इतर क्षेत्रातील विकास आणि निर्यातीसाठी मदत
- 1.10 लाख कोटींची कर्ज तारण योजना कोविडनं प्रभावित झालेल्या क्षेत्रांसाठी असणार आहे
- कोविडनं प्रभावित झालेल्या 25 लाखांहून अधिक लघु उद्योगांना आणि उद्योजकांना कर्ज तारण योजनेचा फायदा
- तीन वर्षांसाठी प्रत्येकाला 1.25 लाख रुपयांचं कर्ज मिळेल.. त्यासाठी 2% पेक्षा कमी व्याजदर आकारला जाईल
आपत्कालीन कर्ज हमी योजनेसाठी अतिरिक्त ₹ 1.5 लाख कोटींची घोषणा
आरोग्य क्षेत्रासाठी कमाल कर्ज रक्कम ₹ 100 कोटी, कमाल व्याज दर 7.95% इतका आहे तर इतर क्षेत्रांसाठी व्याजदर 8.25% इतका असेल. उद्भवणाऱ्या गरजा लक्षात घेता या योजनांची व्याप्ती बदलत राहिल असं केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या. आपत्कालीन कर्ज हमी योजनेसाठी अतिरिक्त ₹ 1.5 लाख कोटींची घोषणा देखील त्यांनी केली. आत्मनिर्भर भारत पॅकेजचा भाग असलेली सदर योजना मे 2020 मध्ये सुरु करण्यात आली होती, असं त्यांनी सांगितलं.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, सुक्ष्म वित्त संस्थांच्या माध्यमातून 25 लाख व्यक्तींसाठी पत हमी योजना सुरु केली आहे. सुमारे 25 लाख कर्जदारांना अनुसूचित वाणिज्य बँकांमध्ये कर्ज घेण्यासाठी नवीन किंवा सध्या असलेल्या गैर-वित्तीय संस्थांच्या माध्यमातून 1.25 लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल. किमान कर्जपुरवठा ₹ 1.25 लाख, आरबीआयने निर्धारीत केलेल्या व्याजदरापेक्षा किमान 2% कमी दराने करण्यात येईल. आता लक्ष नवीन कर्जपुरवठ्यावर आहे, याचा NPAs व्यतिरिक्त सर्व कर्जदारांना लाभ होईल.देशातील लहानात लहान कर्जदाराला लाभ व्हावा या उद्देशाने सुक्ष्म वित्त संस्थांसाठी नवीन पत हमी योजना जाहीर करण्यात आली आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या.