Central Railway : मध्य रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे संरक्षण दलाने (RPF) सांगितले की, गेल्या चार महिन्यांत, ऑपरेशन नन्हे फरिश्ते दरम्यान आरपीएफकडून सरकारी रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचार्‍यांच्या समन्वयातून रेल्वे प्लॅटफॉर्मवरून 504 मुलांची सुटका केली आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करत दिली आहे. काय म्हणाले सुतार?
 
330 मुले आणि 174 मुलींची सुटका
आरपीएफच्या म्हणण्यानुसार, मध्य रेल्वे स्थानकावरून यावर्षी 330 मुले आणि 174 मुलींचा समावेश असून चाइल्डलाइन सारख्या खाजगी संस्थेच्या मदतीने त्यांना त्यांच्या पालकांना भेट करून देण्यात आली. तर गेल्या वर्षी मध्य रेल्वेच्या स्थानकातून आरपीएफने 603 मुले आणि 368 मुलींची सुटका केली होती. रेल्वेने अलीकडेच स्वयंसेवी असोसिएशनशी एक सामंजस्य करार केला, ज्याला 'सेव्ह द चिल्ड्रन मूव्हमेंट' असेही म्हटले जाते, ज्याच्या माध्यमातून रेल्वेद्वारे मानवी तस्करी थांबवण्यासाठी काम केले जाते. काही वेळेस कौटुंबिक समस्या किंवा चांगल्या आयुष्याच्या शोधात  रेल्वे स्थानकांवर भटकलेल्या मुलांची प्रशिक्षित RPF कर्मचार्‍यांनी सुटका केली होती.


 






नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या चिल्ड्रन्स फाउंडेशनशी संलग्न 
आरपीएफने एका निवेदनात म्हटले आहे की, ही एनजीओ नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या चिल्ड्रन्स फाउंडेशनशी संलग्न आहे. RPF ने ऑपरेशन आहत (मानवी तस्करी विरुद्ध कारवाई) देखील सुरू केले असल्याचे सांगितले


2022 मध्ये मध्य रेल्वे स्थानकांमधून सुटका करण्यात आलेल्या मुलांची संख्या, विभाग पुढीलप्रमाणे : 
मुंबई (206 मुले आणि 79 मुली), 
पुणे (50 मुले आणि 21 मुली), 
भुसावळ (47 मुले आणि 45 मुली), 
नागपूर (12 मुले आणि 45 मुली) 
सोलापूर (15 मुले आणि 9 मुली).