Amit Shah : 'जनतेमध्ये केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करत असून त्यासाठी हा अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे', असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लोकसभेत (Loksabha) म्हटलं आहे तसेच जनेतवर आमचा पूर्ण विश्वास आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना देखील चोख उत्तर दिलं आहे. मणिपूरच्या (Manipur) मुद्द्यावरुन इंडिया आघाडीकडून लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा सध्या सुरु आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सरकारची बाजू लोकसभेत मांडली आहे. 


पंतप्रधान मोदी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान


दोन वेळा आम्ही बहुमताने निवडून आलो आहोत असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पंतप्रधान असल्याचं अनेक अहवालातून स्पष्ट झालं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. सरकारने त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून, पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाही हटवली असं अमित शाह म्हणाले आहेत. 


'जनता सगळं बघते, त्यांना सगळं माहित आहे'


टअविश्वासाचा प्रस्ताव जेव्हा तु्म्ही घेऊन येता तेव्हा तुम्ही सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात, त्यामुळे याबाबत सरकारची बाजू मांडणं गरजेचं आहे, म्हणून मी इथे उभा आहेट,  असं त्यांनी म्हटलं आहे. तर या अविश्वास प्रस्तावावर कोणालाच विश्वास नसल्याचं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, ' जनता सगळ बघत आहे त्यांनी सगळं माहित आहे त्यामुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही.' 


अमित शाह यांचा काँग्रेसवर निशाणा


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं की, अविश्वास प्रस्तावाला आमचा कोणताही आक्षेप नाही. पण आपलं स्वत:चं सरकार वाचवण्यासाठी भ्रष्टाचार करणं हे युपीएचं वैशिष्टये आहे.  पंतप्रधान मोदींनी 'भ्रष्टाचार छोडो भारत, राजवंश छोडो भारत आणि तुष्टीकरण छोडो भारत'चा नारा दिला आहे. सत्तेचे रक्षण करणे हे युपीएचं काम आहे, असं म्हणत अमित शाह यांनी काँग्रेसवरुन निशाणा साधला आहे.


अमित शाह यांच विरोधकांवर टीकास्त्र 


फक्त तुम्हालाच सरकारवर अविश्वास आहे देशाच्या जनेताला सरकावर अविश्वास नाही असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. तर या अविश्वासाच्या प्रस्तावाला काही अर्थ नसल्याचं म्हणत अमित शाह यांनी सरकारच्या कामाचा पाढा वाचला. 


देशाविरोधात कारवाई करणाऱ्यांवर कारवाई केली - अमित शाह 


मोदी सरकारच्या काळात काश्मिरमधील दहशतवाद संपवण्यांचं काम आम्ही केलं आहे. पीएफयावर आम्ही बंदी घातली. काश्मिरमधील दलित आदिवासींना आम्ही आरक्षण दिलं. तर देशाविरोधात कारवाई करणाऱ्यावर आम्ही कारवाई केली असं अमित शाह यांनी संसदेत म्हटलं आहे. 


मणिपूरमधील घटना लज्जास्पद


मणिपूरमधील घटना ही लज्जास्पद आहेच पण त्यावर राजकारण करणं हे त्याहून लज्जास्पद असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे. तर सरकार हे मणिपूरच्या मुद्द्यावर तयार असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे. तर विरोधकांना ही चर्चा व्हायला नकोय असा दावा देखील त्यांनी केला आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधक चर्चा होऊ देत नाही असा आरोप अमित शाह यांनी विरोधकांवर केला आहे. तर यावेळी गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारने मणिपूरमध्ये केलेल्या कामांविषयी देखील माहिती दिली आहे. 


 


हेही वाचा :


Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधींनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप, भाजपच्या महिला खासदारांकडून गैरवर्तनासंदर्भात तक्रारीचं पत्र