Chandrayaan 3 Update: इस्रोनं (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan 3) चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत आणलं आहे. आता चांद्रयान 174 किमी x 1437 किमीच्या लहान लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. चांद्रयान-3 कदाचित आपल्या निश्चित लक्ष्यापेक्षा पुढे जात आहे. मात्र इस्रोकडून अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
इस्रोनं 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1.40 वाजता कक्षा बदलली. म्हणजे चांद्रयान-3 चं थ्रस्टर्स चालू झाले. 5 ऑगस्ट 2023 रोजी, जेव्हा चांद्रयान-3 चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचलं. त्यानंतर त्यानं चंद्राची पहिली छायाचित्रं प्रसिद्ध केली.
त्यावेळी चांद्रयान-3 चंद्राभोवती 164 x 18074 KM च्या लंबवर्तुळाकार कक्षेत 1900 किमी प्रति सेकंद या वेगानं फिरत होतं. जे 6 ऑगस्ट 2023 रोजी 170 x 4313 किमी कक्षेत कमी करण्यात आलं. म्हणजेच, ते चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत पाठवण्यात आलं.
चांद्रयान-3 चा किती प्रवास बाकी?
14 ऑगस्ट 2023: चौथी कक्षा पहाटे बारा ते 12:04 पर्यंत बदलला जाईल.
16 ऑगस्ट 2023: सकाळी 8:38 ते 8:39 दरम्यान, पाचवी कक्षा बदलली जाईल. म्हणजेच, चांद्रयानाची इंजिनं फक्त एका मिनिटासाठी चालू राहतील.
17 ऑगस्ट 2023: चांद्रयान-3 चं प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. त्याच दिवशी, दोन्ही मॉड्यूल चंद्राभोवती 100 किमी x 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत असतील.
18 ऑगस्ट 2023: लँडर मॉड्यूलचे डीऑर्बिटिंग दुपारी 4.45 ते 4.00 दरम्यान होईल. म्हणजेच त्याच्या कक्षेची उंची कमी होईल.
20 ऑगस्ट 2023: चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल रात्री पावणे दोन वाजता डि-ऑर्बिटिंग करेल.
23 ऑगस्ट 2023: लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. जर सर्व काही ठीक झाले तर लँडर साडेसहा वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
चांद्रयान-3 चंद्रावर कधी उतरणार?
चांद्रयान-3 चं 14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून यशस्वीरत्या प्रक्षेपण पार पडलं. 1 ऑगस्ट रोजी चांद्रयानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी प्रवास सुरु केला. यानंतर आता चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत पोहोचलं आहे. चांद्रयान-3 ला ट्रान्सलुनर ऑर्बिट'मध्ये ठेवण्यात आलं आहे. इस्रोने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे चंद्रावर उतरेल. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा प्रयत्न करेल. चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी माहिती देताना सांगितलं होतं की, "जर सर्व काही ठीक पार पडलं तर चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल."
चांद्रयान-3 मोहिम महत्त्वाच्या टप्प्यावर
चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यावर अंतराळ यानाचा वेग कमी होतो, ज्यामुळे चंद्राच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राला चंद्राच्या स्थिर कक्षेत खेचता येते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामध्ये शिरण्यास चांद्रयान-3 अयशस्वी झाल्यास त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चांद्रयान-3 चंद्रावर कोसळू शकते किंवा त्यापासून दूर फेकले जाऊ शकते. त्यामुळे चांद्रयान-3 साठी पुढचे काही तास फार महत्त्वाचं आहेत.