नवी दिल्ली : अल्प बचत योजनाधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. 2022 या नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीवरील अल्प बचत योजनांवरील (Small Savings Schemes) व्याजदर कायम ठेवले आहेत. यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रासह (NSC) सर्वच छोट्या बचत योजनांवरील व्याज दर 2021-2022 च्या शेवटच्या तिमाहीत होते, तेच कायम राहणार आहेत.  


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने नुकतीच यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. सरकारने सलग पाच तिमाहींवरील व्याजदरात बदल केले नाहीत. सरकारच्या या निर्णयामुळे वाढती महागाई आणि घटत्या उत्पन्नामुळे चिंतीत असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जाणून घेवूया कोणत्या अल्प योजना आहेत, ज्यांच्यावरील व्याजदर कायम आहे. 


भविष्य निर्वाह निधी (PPF)
भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पब्लिक प्रोविडंट फंड (PPF) वर देण्यात येणारे 7.1 टक्के वार्षिक व्याजदर कायम राहील.


राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)
 राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)योजनेवर पीपीएफनंतर सर्वात जास्त व्याज मिळते. हे व्याज 6.8 टक्के  कायम राहील.


सुकन्या समृद्धी योजना (SSY)
कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी वयाच्या 18 वर्षापर्यंत सुकन्या समृद्धी योजना आहे. या योजनेवर पीपीएफपेक्षा जास्त व्याज दिले जाते. सध्या या योजनेवर 7.6  टक्के व्याज मिळते, ते कायम आहे. 


जेष्ठ नागरिक बचत योजना
कमी उत्पन्न असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे. या योजनेवर 7.4 टक्के दिले जाणारे व्याज कायम आहे. 


पोस्ट ऑफिस बचत योजना
पोस्ट ऑफिस बचत योजनाच्या माध्यमातून पाच वर्षाच्या फिक्स डिपॉजीटवर 6.7 टक्के व्याज दिले जाते. ही व्याजाची रक्कम कायम ठेवण्यात आली आहे. 


महत्वाच्या बातम्या