बंगळुरु : भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी तुरुंगात असलेल्या एआयएडीएमकेच्या माजी महासचिव शशिकला यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप होत आहे. जेलमधील सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर शशिकला यांची बडदास्त ठेवली जात असल्याचं पाहायला मिळालं.

तुरुंगात सर्व महिला कैद्यांना पांढरी साडी नेसणं बंधनकारक असतं. मात्र शशिकला यांना हा नियम लागू नसल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आपल्या आवडीचे कपडे घालून शशिकला तुरुंगात वावरत असल्याचं समोर आलं आहे.

भ्रष्टाचार प्रकरणी दोषी असलेल्या शशिकला बंगळुरुच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. मात्र एखाद्या कैद्याला ज्या सुविधांपासून वंचित ठेवलं जातं, त्या सर्व व्हीआयपी सुविधा शशिकलांना मिळत असल्याचा दावा केला जात आहे.

बंगळुरु सेंट्रल जेलच्या वरिष्ठ अधिकारी डी रुपा यांनी 13 जुलै रोजी एक अहवाल सादर केला. यानुसार व्हीआयपी सुविधा मिळाव्यात, यासाठी शशिकला यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे.
शशिकला यांना प्रायव्हसी मिळावी, म्हणून आजुबाजुचे पाच सेल रिकामे ठेवल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय त्यांच्या रुममध्ये टीव्ही असल्याचाही दावा केला जात आहे.

https://twitter.com/Madrassan/status/899488376478351360