नवी दिल्ली : 2008 मधील मालेगाव स्फोटाप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहपाठोपाठ लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितलाही जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 9 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या कर्नल पुरोहितला जामीन मंजूर केला.
मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कर्नल पुरोहितेन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुरोहितवर 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटाचा आरोप आहे.
दरम्यान, कर्नल पुरोहित नऊ वर्षांनतंर तुरुंगाबाहेर येणार असला तरी त्याच्यावरील खटला सुरुच राहणार आहे.
एनआयएने नव्याने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये सर्वच आरोपींवरचा मोक्का काढला होता. त्यामुळे कर्नल पुरोहितच्या सुटकेचा मात्र मोकळा झाला होता.
2008 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता तर 80 जण जखमी झाले होते. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावत एका बाईकमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यानंतर साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली होती.
2008 मालेगाव स्फोट : कर्नल पुरोहितला अखेर जामीन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Aug 2017 10:56 AM (IST)
एनआयएने नव्याने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये सर्वच आरोपींवरचा मोक्का काढला होता. त्यामुळे कर्नल पुरोहितच्या सुटकेचा मात्र मोकळा झाला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -