मुंबई: सीबीएसई बोर्डाच्या (CBSE) दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. सीबीएसईचा यंदाचा निकाल तब्बल 96.21 टक्के लागला आहे. सीबीएसई निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल तब्बल 96.36 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल 96.11 टक्के एवढा आहे.
मार्च महिन्यात सीबीएसई बोर्डाची 10वीची परीक्षा घेण्यात आली होती. cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in या वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे.
आपला निकाल कसा पाहाल:
सगळ्यातआधी CBSEच्या अधिकृत वेबसाईट www.cbse.nic.in, www.cbseresults.nic.in आणि www.results.nic.in लॉग इन करा.
वेबसाइटवर दिलेली लिंक ‘Class X 2016‘ वर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि महत्त्वाची माहिती भरा.
त्यानंतर तुमची माहिती सब्मिट करा.