Jai bhim Actor Suriya :  दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या (Suriya) सध्या त्याच्या 'जय भीम' या चित्रपटातील अभिनयामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील सूर्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. जाणून घेऊयात सूर्याबद्दलच्या काही खास गोष्टी..  


सूर्याची संपत्ती-


1975 मध्ये सूर्याचा  जन्म झाला. थ्रिलर चित्रपट ‘Nerrukku Ner’मधून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट सुपर हिट ठरला होता. एका मीडिया रिपोर्टनुसार, सूर्या 250  कोटींपेक्षा जास्त संपत्तीचा मालक आहे. सूर्या एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी जवळपास  35-40 कोटी रूपये मानधन घेतो. टीव्ही होस्टिंग आणि ब्राँड इंडोर्समेंटसाठी देखील सूर्या मानधन घेतो. सूर्याला  रोड ट्रिप्सला जायला आणि कॅम्पिंग करायला आवडते. तसेच  फोर्च्युनर,जॅगवार, ऑडी ऐ 7, मर्सिडीज बेंज, एम.एल क्लास आणि ऑडी क्यू 7 इत्यादी आलिशान गाड्या सूर्याकडे आहेत. 






Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरातील Pratik Sehajpal, Karan Kundra आणि Tejasswi Prakash च्या अडचणीत वाढ


सूर्याला 3 वेळा तमिळनाडु  स्टेट फिल्म पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच त्याने 3 वेळा फिल्म फेअर अवार्ड देखील पटकवला आहे. सध्या  सूर्याच्या जय भीम या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  या चित्रपटात   प्रकाश राज, मनिकंदन, गुरू सोमसुंदरम, अभिनेत्री लिजो मोल जोस, राजिशा विजयन या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या 1995 सालातल्या सत्य घटनेवर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. 


Aishwarya Rai - Abhishek Bachchan Post For Aaradhya : आराध्या बच्चनला अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चनने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा