Tamilnadu Idli Amma : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कार्यामधून चर्चेत असतात. शिवाय, ते सोशल मीडियावर देखील बरेच सक्रीय असतात. 8 मे ला म्हणजेच काल जागतिक मातृदिन खास पद्धतीने साजरा केला. तामिळनाडूमध्ये लोकांना अवघ्या 1 रुपयात इडली खाऊ घालणाऱ्या इडली अम्माला आनंद महिंद्रा यांनी हक्काचं नवीन घर दिलं आहे.


आनंद महिंद्रा यांनी तसं वचनदेखील दिलं होतं. आणि ते त्यांनी पूर्णदेखील केलं आहे. तमिळनाडूमधल्या कोईम्बतूर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या एम. कमलताल या 'इडली अम्मा' या नावाने प्रसिद्ध आहेत. ईडली अम्माला त्यांचं हक्काचं घर दिल्याची माहिती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ईडली अम्मा एका आईच्या पालनपोषण, काळजी आणि निस्वार्थीपणाच्या या गुणांचं मूर्त स्वरूप असल्याची भावना यावेळेला आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली. 






'इडली अम्मा' या नावाने प्रसिद्ध असलेल्या तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यात राहणारी एम. कमलताल, तिच्या भागात काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांना आणि इतरांना फक्त 1 रुपयात इडली विकते आणि त्या जवळपास 3 वर्षांपासून हे काम करत आहेत. यामुळे, त्यांच्या कामावर खूश होऊन, महिंद्रा यांनी 'इडली अम्मा'ला घर भेट देण्याचे वचन दिले होते आणि आता त्यांनी या 'मदर्स डे'ला पूर्ण केले आहे. 


10 सप्टेंबर 2019 रोजी आनंद महिंद्रा यांनी 'इडली अम्मा' चा व्हिडिओ शेअर केला होता. त्या दरम्यान त्यांनी 'इडली अम्मा'च्या व्यवसायात गुंतवणूक करून तिला लाकडाच्या चुलीऐवजी गॅसचा स्टोव्ह देण्याचे सांगितले होते. सोशल मीडियावर त्यांच्या या उपक्रमाचे यूजर्सकडून   खूप कौतुक होत आहे. 



महत्वाच्या बातम्या :