नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर देशातील शेतकरी, नोकरदार, व्यावसायिकांसह सगळ्यांच्या नजरा होत्या. अर्थसंकल्पात आयकराच्या संरचनेत सूट मिळणार की नाही याकडे नोकदारांचं लक्ष होतं. परंतु यंदा टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.


कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीनंतर हा अर्थसंकल्प संजीवनी म्हटला जात होता. परंतु मोदी सरकारने यंदा आरोग्य क्षेत्रावर फोकस करण्यात आला आहे. परंतु करदात्यांच्या हाती यंदा विशेष काही लागलं नाही.

अर्थमंत्र्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. परिणामी 2020-21 सालचा टॅक्स स्लॅबच 2021-22 मध्ये कायम राहणार आहे. त्यामुळे टॅक्स स्लॅबमध्ये सूट मिळण्याच्या अपेक्षा असलेल्या करदात्यांची आणि नोकरदारांची निराशा झाली आहे.

75 वर्षांवरील पेन्शनधारकांना दिलासा
दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. यानुसार 75 वर्षांवरील अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आता आयकर परताव्यात दिलासा मिळाला आहे. आता 75 वर्षांवरील पेन्शनधारकांना त्यांच्या स्लॅबनुसार टॅक्स भरावे लागतील पण रिटर्न फाईल करण्याची गरज नाही.


हाच टॅक्स स्लॅब कायम राहणार


उत्पन्न                                      कर
2.5 लाख -                            कोणताही कर नाही
2.5 लाख ते 5 लाख -             5 टक्के कर
5 लाख ते 7.5 लाख -             10 टक्के
7.5 लाख ते 10 लाख -           15 टक्के
10 लाख ते 12.5 लाख -        20 टक्के कर
12.5 लाख ते 15 लाख -        25 टक्के
15 लाखांपेक्षा जास्त -           30 टक्के कर


संबंधित बातम्या