नवी दिल्ली: ब्रिटीशांची परंपरा मोडत मोदी सरकारकडून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पहिल्यांदाच रेल्वे आणि सर्वसामान्य अर्थसंकल्प एकत्र मांडला. जेटलींनी 2017- 18 या वर्षासाठी 21 लाख 47 हजार कोटींचं बजेट सादर केलं.

त्यापैकी रेल्वेसाठी 1 लाख 31 हजार कोटीची तरतूद करण्यात आली. तर सर्वाधिक 2 लाख 74 हजार कोटीची तरतूद संरक्षण क्षेत्रासाठी आहे.

तीन लाखांवरील रोख व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच राजकीय पक्षांना केवळ 2 हजार रुपयांपर्यंतचीच रोख देणगी स्वीकारता येईल. त्यावरील रक्कम चेक किंवा डिजिटल पेमेंटने स्वीकारावे लागतील.

 टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा

जेटली यांनी मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात काहीसा दिलासा दिला. कारण टॅक्स स्लॅबमध्ये बदल न करता, टॅक्स रेटमध्ये बदल केला.

म्हणजे, आता 2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी यापूर्वी असलेला 10 टक्के टॅक्स आता 5 टक्क्यांवर आणला आहे. इतकंच नाही तर 50 हजार रुपयांची सवलत (रिबेट) दिल्यामुळे आता 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्यांना काहीही टॅक्स द्यावा लागणार नाही.

त्यानंतरच्या 3 ते 5 लाख या उत्पन्नावर तुम्हाला 5 टक्के कर लागेल. म्हणजे वरच्या 2 लाखांवर तुम्हाला 5 टक्के म्हणजे 10 हजार रुपये टॅक्स भरावा लागेल. (अधिक माहितीसाठी क्लिक करा)

5 लाखांवरील उत्पन्नधारकांना करात वार्षिक 12 हजार 500 रुपये सवलत असेल.

 तर 50 लाख ते 1 कोटी उत्पन्नधारकांना टॅक्स असेलच शिवाय 10 टक्के अधिक सरचार्जही असेल.


रेल्वे बजेट


ब्रिटीशांची परंपरा मोडत पहिल्यांदाच सर्वसाधारण बजेटसोबतच रेल्वे बजेट सादर करण्यात आलं. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18 चं 1 लाख 31 हजार कोटींचं रेल्वे बजेट सादर केलं. ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणा अरुण जेटली यांनी केली.

 रेल्वे बजेटमधील मुद्दे

  • - 3500 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग बनवला

  • - ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही

  • - 7 हजार रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर

  • - प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 1 लाख कोटींचा फंड

  • - ब्रॉडगेज लाईनवर मानवरहित क्रॉसिंग

  • - धार्मिक आणि पर्यटनस्थळांसाठी नव्या गाड्या सुरु करणार

  • - दिव्यांगासाठी रेल्वे स्टेशनवर लिफ्ट आणि सरकते जिने

  • - 7 हजार रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर

  • - 2019 पर्यंत सर्व रेल्वेमध्ये बायोटॉयलेट

  • - IRCTC, IRCON या रेल्वेशी निगडीत कंपन्या लवकरच शेअर बाजारात लिस्ट करणार

  • - सुरक्षा दलातल्या जवानांना त्यांची तिकीटं बुक करण्यासाठी स्वतंत्र सिस्टीम राबवणार

  • रेल्वे अर्थसंकल्पाबाबत अधिक माहितीसाठी क्लिक करा


शेती



  •  शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी 10 लाख कोटींची तरदूत

  • पीक विम्यासाठी 9 हजार कोटी कर्ज देणार

  • डेअरी विकासासाठी 8 हजार कोटी

  • 5 वर्षात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प

  • शेतीला पतपुरवठा करणाऱ्या पतसंस्था, सोसायट्या आणि जिल्हा बँकांना कोअर बँकिंगने जोडणार


उद्योगांसाठी काय?



  • 50 कोटी उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना 5 टक्के करसवलत

  • स्टार्टअपच्या नफ्यावरील करसवलतीची मर्यादा 5 वरुन 7 वर्षापर्यंत वाढवली.

  • बांधकाम उद्योजकांना न विकलेल्या घरांना घरांच्या किमतीवरील करामधून सूट

  • स्टार्टअपला उभारी देण्यासाठी करकपातीचे संकेत

  • छोट्या कंपन्यांच्या कार्पोरेट करात कपात करणार


महिलासांठी काय?



  • गावागावात महिला शक्ती केंद्र उभारणार

  • अंगणवाडीत महिलांना स्वयंरोजगार शिक्षण देण्यासाठी 5000कोटींची तरतूद

  • मनरेगामधून 55 टक्के महिलांना रोजगार

  • गर्भवती महिलांच्या खात्यात 6 हजार रुपये


युवकांसाठी बजेटमध्ये काय?



  •  तरुणांना ऑनालाईन शिक्षण देण्यासाठी 'स्वयम' योजना

  • संकल्प प्रकल्पासाठी 4 हजार कोटी, संकल्पद्वारे तरुणांना रोजगार प्रशिक्षण देणार

  • 600 जिल्ह्यात युवा विकास केंद्र उभारणार

  • टेक इंडिया हा सरकारचा आगामी अजेंडा

  • IIT, मेडिकलसह सर्व उच्च शैक्षणिक प्रवेश परीक्षा एकाच संस्थेकडून व्हाव्यात यासाठी 'राष्ट्रीय परीक्षा बोर्ड' स्थापन करणार

  • नवीन मेट्रो धोरणामुळे तरुणांसाठी नोकरीच्या संधी

  • वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी २५००० नवीन जागा


ज्येष्ठ नागरिकांसाठी काय?



  • ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ स्मार्ट कार्ड देणार

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी LIC पॉलिसीवर 8% टक्क रिटर्न मिळणार


 

देशभरात कोण किती टॅक्स देतं?

  • देशातील 3.7 टक्के लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलं.

  • 3.7 कोटींपैकी 99 लाख लोकांनी त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचं दाखवलं

  • 1.95 लाख लोकांनी त्यांचं उत्पन्न अडीच ते 5 लाखांपर्यंत दाखवलं

  • 52 लाख लोकांनी 5 -10 लाखांपर्यंत उत्पन्न दाखवलं

  • 24 लाख लोकांनी त्यांचं उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त दाखवलं

  • 76 लाख नोकदारांपैकी 56 लाख नोकदारांचं उत्पन्न 5 लाखांपर्यंत दाखवलं

  • 20 लाख व्यापाऱ्यांनी 5 लाख उत्पन्न दाखवलं.

  • 1.72 लाख लोकांनी त्यांचं उत्पन्न 50 लाख दाखवलं

  • मागील पाच वर्षात 1.25 कोटींपेक्षा जास्त कारची विक्री झाली.

  • 2015 मध्ये 2 कोटी लोकांनी परदेशवारी केली


 

LIVE UPDATE -  अरुण जेटली लाईव्ह

आता 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंत - 5 टक्के टॅक्स (यापूर्वी 10 टक्के होता)

*3लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री,
*3 ते 5 लाख उत्पन्न- 5 % टॅक्स
*5 लाखांवरील उत्पन्नधारकांना- करात 12500 सवलत

  • राजकीय पक्षांना आता केवळ 2 हजार रुपयांची देणगीच रोख स्वीकारता येणार, त्यावरील रकमेसाठी चेक अनिवार्य

  • स्वस्त घरांसाठी आता कार्पेट एरियाच्या मर्यादेत वाढ

  • नयी दुनिया है नया है रंग काले धन को भी बदलने पडा अपना रंग, जेटलींची शायरी

  • देशातील 3.7 कोटी लोक कर भरतात

  • फक्त 20 लाख व्यापाऱ्यांनीच 5 लाख उत्पन्न दाखवलं

  • 52 लाख लोकांनी 5 ते 10 लाख उत्पन्न दाखवलं

  • 76 लाख लोक 5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न दाखवतात.

  • 99 लाख लोकांनी अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न दाखवलं

  • 3.7 कोटी लोक टॅक्स भरतात

  • 4 कोटी 2 लाख लोकांद्वारे 1.74 कोटी रिटर्न भरला जातो

  • देशातून पलायन करणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यासाठी नवा कायदा तयार करणार

  • संरक्षण खात्याचं बजेट २ लाख ७४ हजार कोटी रूपये. सर्वाधिक बजेट असलेलं मंत्रालय.

  • सैनिकांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही

  • 21 लाख 47 हजार कोटींचं बजेट, 25 टक्के भांडवली खर्च

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ स्मार्ट कार्ड देणार

  • आधार कार्डद्वारे आता खरेदी शक्य, डेबिड कार्डप्रमाणे वापर करता येणार

  • 2.44 लाख कोटींची कर्जाची योजना, या योजनेत एससी, एनटी वर्गाला प्राधान्य

  • भिम अॅप प्रोत्साहनासाठी कॅशबॅक आणि बक्षीस योजना

  • छोट्या शहरांमध्ये विमानतळ उभारणार

  • गावागावात महिला शक्ती केंद्र उभारणार

  • सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी 2 लाख 41 हजार 346 कोटींची तरतूद

  • पायाभूत सुविधांसाठी आजवरची सर्वाधिक म्हणजेच 3 लाख 96 हजार कोटी रुपयांची तरतूद

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी LIC पॉलिसीवर 8% टक्क रिटर्न मिळणार

  • IRCTC चे शेअर्स आता विक्रीसाठी उपलब्ध होणार

  •  2025 पर्यंत देश टीबी, गोवर, कुष्ठरोगमुक्त करणार

  • कच्च्या तेलाचं भांडार उभारणा

  • मल्टिस्टेट को ऑप. सोसायटी अॅक्टमध्ये दुरुस्ती करणार

  • माध्यमिक शिक्षणासाठी कल्पकता निधी उभारणार आणि भारतभरात एकूण १०० स्किल सेंटर्सची निर्मिती करणार

  • अंगणवाडीत महिलांना स्वयरोजगार शिक्षण देण्यासाठी 5000कोटींची तरतूद

  • 2019 पर्यंत सर्व रेल्वेमध्ये बायोटॉयलेट उभारणार

  • 25 रेल्वे स्थानकावर सरकते जिने आणि लिफ्टं बनवणार

  • रेल्वेसाठी 1 लाख 31 हजार कोटीचं बजेट, 1 लाख कोटी रुपये राष्ट्रीय रेल सुरक्षा फंड

  • 3500 किमी नवे रेल्वे रुळ, 7 हजार रेल्वे स्टेशन सौरऊर्जेवर

  • पर्यटन आणि तीर्थ क्षेत्रांसाठी विशेष ट्रेन सुरु करणार

  • इंटरनेटवरुन रेल्वे तिकीट बुक केल्यास सर्व्हिस चार्ज लागणार नाही

  • 2025 पर्यंत टीबी रोगाचा नायनाट करु

  • डॉक्टर संख्या वाढविण्यासाठी प्रवेशाच्या जागा वाढवणार

  • वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी २५००० नवीन जागा

  • IIT, मेडिकल सह सर्व उच्च शैक्षणिक प्रवेश परीक्षा एकाच संस्थेकडून व्हाव्यात यासाठी 'राष्ट्रीय परीक्षा बोर्ड' स्थापन करणार- जेटली

  • झारखंड आणि गुजरातमध्ये दोन नव्या AIIMS स्थापन करण्याचा अर्थसंकल्पात प्रस्ताव

  • गर्भवती महिलांना 6000 रुपये

  • संकल्प प्रकल्पासाठी 4 हजार कोटी, संकल्पद्वारे तरुणांना रोजगार प्रशिक्षण देणार

  • 600 जिल्ह्यात युवा विकास केंद्र उभारणार

  • टेक इंडिया हा सरकारचा आगामी अजेंडा

  • तरुणांना ऑनालाईन शिक्षण देण्यासाठी 'स्वयम' योजना

  • स्वच्छ भारत योजनेअंतर्गत 60 टक्के गावात शौचालयं बनली

  • ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे

  • 1 कोटी कुटुंब गरिबीमुक्त करणं हे सरकारचं लक्ष्य

  • तीन वर्षात 20 हजार कोटी नाबार्डला देणार

  • २०१९ पर्यंत १ कोटी कुटुंबाना घरं देणार, दारिद्र्य रेषेच्या वर आणून त्यांचं जीवनमान उंचावण्याचं लक्ष्य, ग्रामीण भागतील विजेसाठी 4500 कोटींची तरतूद

  • प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 19 हजार कोटी

  • 2019 पर्यंत 1 कोटी घरं बांधणार, त्यासाठी 23 हजार कोटी रुपये

  • 1 मे 2018 पर्यंत सर्व गावात वीज पोहोचवणार

  • मनरेगा योजनेसाठी 48 हजार कोटी

  • पीक विम्यासाठी 9 हजार कोटी कर्ज देणार

  • ग्रामविकाससाठी 3 लाख कोटी

  • 2019 पर्यंत 50 लाख ग्राम पंचायती गरिबी मुक्त करणार

  • डेअरी विकासासाठी 8 हजार कोटी

  • 5 वर्षात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प

  • टेक इंडिया हा सरकारचा आगामी काळातील अजेंडा

  • शेतीला पतपुरवठा करणाऱ्या पतसंस्था, सोसायट्या आणि जिल्हा बँकांना कोअर बँकिंगने जोडणार

  • रेल्वेचं बजेट बंद झालं असलं तरीही त्यांची स्वायत्तता कायम राहणार

  • नोटाबंदीचे वाईट परिणाम केवळ वर्षभरासाठीच

  • देशातल्या प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा आमचा प्रयत्न: अरुण जेटली

  • जीएसटी आणि नोटाबंदीचा निर्णय ऐतिहासिक

  • करचुकवेगिरीमुळे देशातील जनतेचं मोठं नुकसान: अरुण जेटली

  • अतिरेकी कारवाया, बनावट नोटा, भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी नोटाबंदी गरजेची : अरुण जेटली

  • नोटाबंदीचा निर्णय जेवढा महत्त्वाचा तेवढाच धाडसी, नोटाबंदीमुळे सरकारी महसूल वसुलीला फायदा : अरुण जेटली

  • 'चांगल्या उद्दिष्टांचा कधीच पराभव होत नाही' अरुण जेटलींचा भाषणात महात्मा गांधींच्या वचनाचा नोटाबंदीबाबत उल्लेख

  • महागाई नियंत्रणात आणण्यात यश : अरुण जेटली

  • गेल्या वर्षात देशात परदेशी गुंतवणूक वाढली

  • उत्पादन क्षेत्रामध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक

  • सरकार जनतेच्या पैशाचा पहारेकरी, काळ्या पैशाविरोधात मोठी लढाई

  • काळ्या पैशांविरुद्ध सध्या मोठं युद्ध सुरु आहे : अरुण जेटली

  • नोटाबंदीदरम्यान सहकार्य केल्याबद्दल देशाचे आभार

  • लोकसभेचं कामकाज आज स्थगित नाही, अर्थसंकल्पासाठी राष्ट्रपतींनी आजचा दिवस निश्चित केला आहे : सुमित्रा महाजन