हेडलाईन्स

  1. पहिल्यांदाच रेल्वे आणि सर्वसाधारण बजेट एकत्र, अर्थमंत्री सादर करणार ऐतिहासिक बजेट, एबीपी माझावर मॅरेथॉन कव्हरेज


 

  1. यंदाच्या बजेटवर नोटाबंदीचं सावट, आर्थिक विकासदर चढा ठेवण्याचं मोदी सरकारसमोर आव्हान, करसवलतींच्या घोषणाकडे देशाचं लक्ष


 

  1. पालिका निवडणुकीत दुप्पट खर्च करण्याची मुभा, निवडणूक आयोगाचा उमेदवारांना सुखद धक्का, 'अ' वर्गाच्या पालिकेत 10, तर जिल्हा परिषदात 6 लाख खर्चाची मुभा


 

  1. उद्धव ठाकरेंनी झिडकारल्यानंतर राज ठाकरेंच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष, आज राज ठाकरेंचं कार्यकर्ता मेळाव्यात भाषण


 

  1. माजी परराष्ट्र राज्यमंत्री ई. अहमद यांचे निधन, काल संसदेत आलेला हृदयविकाराचा झटका, दिल्लीत रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास


 

  1. उत्तर प्रदेशमधील निकालानंतर शिवपाल यादव नवा पक्ष स्थापन करणार, काँग्रेससोबत आघाडी केल्यानं नाराजी


 

  1. भारत-इंग्लंड संघांमधल्या ट्वेन्टी ट्वेन्टीच्या युद्धाची आज निर्णायक लढाई, विराट, धोनी, युवराज आणि रैनाकडून सुधारित कामगिरीची अपेक्षा